मुंबई न्यूज : बहुजननामा ऑनलाईन – केंद्राने महाराष्ट्रातील नव्याने झालेल्या केंद्रीय मंत्र्यावर काम सोपवली आहेत. यातच मागील दोन दिवस झाली केंद्रीय लघु उद्योगमंत्री नारायण राणे (Union Minister Narayan Rane) यांची जनआशीर्वाद यात्रा (Jana ashirwad Yatra) सुरू आहे. आज तिसऱ्या दिवशी त्यांनी नालासोपाऱ्यात माध्यमांशी सवांद साधला आहे. त्यावेळी बोलताना मंत्री नारायण राणे (Union Minister Narayan Rane) यांनी शिवसेनवर (Shiv Sena) जोरदार निशाणा साधला आहे. शिवसेनेचे नेते (Shiv Sena) आणि मंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) हे शिवसेनेत कंटाळले आहे. त्यांना कोणताही निर्णय घ्यायचा असेल तर तो मातोश्रीला विचारूनच घ्यावा लागतो, त्यांना मी फोन करणार आहे’ असा धक्कादायक गौप्यस्फोट मंत्री राणे यांनी केलाय.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
त्यावेळी बोलताना नारायण राणे म्हणाले, ‘शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे फक्त नावापुरते मंत्री राहिले आहे. एकही फाईल एकनाथ शिंदे यांना ‘मातोश्री’ला विचारल्या शिवाय सही करता येत नाही.
ते शिवसेनेत कंटाळले आहे, मी त्यांना फोन करणार आहे, जर ते आमच्याकडे आले तर स्वागतच आहे.
असा दावा नारायण राणे यांनी केला आहे. त्याचबरोबर पुढे आमदार नीलम गोऱ्हे (MLA Neelam Gorhe) यांना मी शिवसेनेत (Shiv Sena) आणलं. त्यांच्या आमदारकीसाठी मी प्रयत्न केले.
आता त्यांची त्यांच्याच पक्षात किती फरफट होत आहे, ते पहा म्हणावे.
असा टोला देखील नारायण राणे (Union Minister Narayan Rane) यांनी लगावला आहे.
पुढे नारायण राणे (Union Minister Narayan Rane) म्हणाले, ‘राष्ट्रवादीबद्दल राज ठाकरे (Raj Thackeray) यांचे म्हणणे मी खोडत नाही.
राष्ट्रवादीच्या स्थापनेनंतर राज्यात जातीपातीचे राजकारण वाढले, ते अगदी बरोबर बोलले होते.
उद्या जर मनसे आणि भाजपची युती झाली तर आम्हाला आनंदच असल्याचं देखील ते म्हणाले.
‘आम्हाला बघून लोक थांबत आहे. आम्ही गर्दी करत नाही लोक आमच्याकडे येत आहे, मला भीती नाही का जीवाची? पिंजऱ्यात राहणाऱ्यांनी आम्हाला उपदेश करू नये. असे ते म्हणाले.
दरम्यान, ‘मी सांगतो मी गेल्या सात वर्षात काय केले , मी माझ्या पैशाने माझ्या वडिलांचे स्मारक केले.
लोकांचे पैशाने केले नाही. त्याला दलदलीत ठेवले नाही’, अशी टीका केली.
दरम्यान, ‘बाळासाहेबांच्या स्मारकावर अभिवादन केलं. त्यानंतर शिवसैनिकांनी स्मारकाचं शुद्धीकरण केलं आहे. गोमुत्र शिपडणाऱ्यांनी नको ते उद्योग न करता हवे ते उद्योग करावे’,
असा देखील हल्लाबोल नारायण राणे यांनी शिवसेनवर केला आहे.
Web Title : Union Minister Narayan Rane | eknath shinde is bored in shiv sena welcome to bjp claims by narayan rane
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
Pune Crime | पोलिसांची नजर चुकवून आरोपीचे पलायन, खराडी मुंढवा बायपास रोडवरील घटना
Raosaheb Danve | ‘गोपीनाथ मुंडे साहेब नसते तर गावच्या पारावर हरिपाठ म्हणत बसलो असतो’