मुंबई : बहुजननामा ऑनलाईन – पक्ष आणि चिन्हाबाबत निवडणूक आयोगाने (Election Commission) जो निर्णय दिला आहे. तो निर्णय अयोग्य आहे. आयोगात चाकर असणाऱ्या लोकांची नेमणूक करण्यात आली, असा निवडणूक आयोग बरखास्त करा अशी मागणी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी केली आहे. जिल्हा प्रमुखांच्या बैठकीनंतर उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी भाजप (BJP) आणि शिंदे गटावर (Shinde Group) जोरदार हल्लाबोल केला.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
ठाकरे नाव चोरू शकत नाहीत
उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) पुढे म्हणाले, शिंदे गटाने धनुष्यबाण (Dhanushyaban Symbol) आणि शिवसेना नाव (Shiv Sena Party Name) चोरलं आहे. हा पूर्वनियोजित कट होता. त्यांनी शिवसेना नाव चोरलं असलं तरी ते ठाकरे नाव चोरू शकत नाहीत. मी माँ आणि बाळासाहेबांच्या (Balasaheb Thackeray) पोटी जन्मला आलो, हे माझं भाग्य आहे. हे भाग्य त्यांना मिळू शकत नाही. दिल्लीवाले त्यांना हे भाग्य देऊ शकत नाहीत, असे म्हणत त्यांनी शिंदे गटावर निशाणा साधला.
https://fb.watch/iO-A7JzhQ5/
2024 ची निवडणूक ही शेवटची ठरु शकते
आज जी परिस्थिती त्यांनी शिवसेनेवर लादण्याचा प्रयत्न केला आहे, ती परिस्थिती उद्या देशातील कोणत्याही पक्षावर आणू शकतात. आता जर सामना केला नाही, तर कदाचीत आगामी 2024 ची निवडणूक ही शेवटची ठरु शकते. त्यानंतर देशात हुकूमशाहीचा नंगा नाच सुरु होईल अशा शब्दात उद्धव ठाकरे यांनी भाजपवर हल्ला चढवला.
सुपारी घेऊन शिवसेनेची हत्या
सध्या शिवसेनेसाठी सर्वात कठीण प्रसंग आहे. शिवसेनाप्रमुख गेले तेव्हा जसा प्रसंग होता, तसा प्रसंग आहे.
बाळासाहेबांच्या मृत्यूनंतर शिवसेना टिकणार नाही असं बोलले जात होते. पण आपण जिंकलो.
सुपारी देऊन शिवसेनेची हत्या करण्याचा प्रयत्न केला आहे.
भाजपचे तळवे चाटण्यासाठी शिवसेनेचा जन्म झालेला नाही, असेही उद्धव ठाकरे यांनी यावेळी सांगितले.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
निवडणूक आयोगाला फक्त…
पक्षनिधीवर बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले, पक्षनिधीचा दावा ठरवण्याचा अधिकार निवडणूक आयोगाला नाही.
नाहीतर आयोगावर खटला भरला जाईल. आयोगाला फक्त चिन्ह आणि नाव ठरवण्याचा अधिकार नाही.
देशात निवडणुका घेणं, पक्षांतर्गत लोकशाही जिवंत ठेवणं हा त्यांचा अधिकार असल्याचे त्यांनी सांगितले.
Web Title :- Uddhav Thackeray | uddhav thackeray attack on eknath shinde and bjp says attempt to kill shivsena
हे देखील वाचा :