मुंबई : बहुजननामा ऑनलाईन – राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी सोमवारी शिवसेना भवन (Shiv Sena Bhavan) येथे राज्यातील पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. यानंतर पत्रकार परिषद घेऊन त्यांनी शिंदे गट (Shinde Group) आणि भाजपवर (BJP) जोरदार हल्लाबोल केला. आज जी परिस्थिती भाजपने शिवसेनवर (Shivsena) लादली आहे, तीच परिस्थिती उद्या देशातील कोणत्याही पक्षावर आणू शकतात. आताच जर त्याचा सामना केला नाही तर कदाचीत 2024 मध्ये होणारी लोकसभेची निवडणूक (Lok Sabha Election-2024) ही शेवटची निवडणूक ठरू शकते. त्यानंतर देशात हुकूमशाहीचा नंगा नाच सुरु होऊ शकतो, असा घणाघात उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी भाजपवर केला.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
शिवधनुष्य जे रावणाला पेललं नाही ते…
उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) याच्यावर निशाणा साधताना म्हणाले, काल ते म्हणाले की अमित शाह (Amit Shah) हे मला वडिलांसारखे आहेत, माझे तर वडील चोरलेच आहेत. आणखी किती जण ह्यांना वडिलांसारखे आहेत, कोण जाणे, असा टोला त्यांनी लगावला. शिवधनुष्य हे रावणाला पेलले नाही, या मिध्यांना काय पेलणार असे म्हणत शिवधनुष्य चिन्ह आणि शिवसेना पक्ष मिळवण्याची आपली लढाई सुरुच राहणार असल्याचे उद्धव ठाकरे यांनी सांगितले.
हा पूर्वनियोजित कट
उद्धव ठाकरे पुढे म्हणाले, शिंदे गटाने धनुष्यबाण (Dhanushyaban Symbol) आणि शिवसेना नाव
(Shiv Sena Party Name) चोरलं आहे. हा पूर्वनियोजित कट होता. त्यांनी शिवसेना नाव चोरलं असलं तरी
ते ठाकरे नाव चोरू शकत नाहीत. मी माँ आणि बाळासाहेबांच्या (Balasaheb Thackeray) पोटी जन्मला आलो,
हे माझं भाग्य आहे. हे भाग्य त्यांना मिळू शकत नाही. दिल्लीवाले त्यांना हे भाग्य देऊ शकत नाहीत,
असे म्हणत त्यांनी शिंदे गटावर निशाणा साधला.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
Web Title :- Uddhav Thackeray | current scenario in maharashtr is not stopped 2024 lok sabha elections may turn out to be last elections country says uddhav thackeray
हे देखील वाचा :
Uddhav Thackeray | निवडणूक आयोग बरखास्त करा, उद्धव ठाकरेंचा भाजप, शिंदे गटावर घणाघात (व्हिडिओ)