नवी दिल्ली : वृत्तसंस्था – शिवसेना नाव (Shivsena) आणि धनुष्यबाण चिन्ह (Dhanushyaban Symbol) निवडणूक आयोगाने (Election Commission) शिंदे गटाला (Shinde Group) देण्याचा निर्णय घेऊन ठाकरे गटाला मोठा धक्का दिला आहे. निवडणूक आयोगाच्या या निर्णयावर ठाकरे गटाने सुप्रीम कोर्टात (Supreme Court) याचिका दाखल केली आहे. या याचिकेवर तातडीने सुनावणी घेण्यात यावी अशी मागणी ठाकरे गटाच्या (Thackeray Group) वकिलांनी कोर्टात केली. मात्र, सरन्यायाधीशांनी ठाकरे गटाची ही मागणी फेटाळून लावत याचिकेवर (Supreme Court) तात्काळ सुनावणी घेण्यास नकार दिला.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
ठाकरे गटाचे वकील अभिषेक मनु सिंघवी (Advocate Abhishek Manu Singhvi) यांनी निवडणूक आयोगाच्या आदेशाचा उल्लेख केला. यावर सरन्यायाधीश म्हणाले, याचिकेला अर्जंट मेन्शन (Urgent Mention) करण्याची प्रक्रिया आहे. ज्याचे पालन केले पाहिजे. त्यसाठी तुम्ही उद्या या अशी सूचना दिली. ही याचिका मेन्शनिंग लिस्टमध्ये (Mentioning List) नव्हती. त्यासाठी कोर्टाने ( Supreme Court) ही याचिका उद्या घेण्यास सांगितले आहे.
Lawyer of Uddhav Thackeray faction mentions plea before Supreme Court, challenging Election Commission's move to allot party name "Shiv Sena" and the symbol "Bow and Arrow" to the faction led by Maharashtra CM Eknath Shinde.
Supreme Court asks the lawyer to mention it tomorrow. pic.twitter.com/HQOh4pbWrp
— ANI (@ANI) February 20, 2023
निवडणूक आयोगाने दिलेला निकाल पक्षपातीपणाचा आहे असा आरोप करत कोर्टाने निकालाल स्थगिती द्यावी अशी
मागणी ठाकरे गटाने याचिकेतून केली आहे.
सुप्रीम कोर्टात ही याचिका तातडीने सुनावणीसाठी यादीत आणण्याचा प्रयत्न ठाकरे गटाचा होता.
ठाकरे गटाची ही खेळी शिंदे गटाने आधीच ओळखली होती.
त्यामुळे निवडणूक आयोगाने निर्णय दिल्यानंतर शिंदे गटाने लगेच सुप्रीम कोर्टात कॅव्हेट दाखल केले होते.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
Web Title :- Supreme Court | uddhav thackeray faction of shivsena moves sc against losing symbol party name supreme court supreme court asks the lawyer to mention it tomorrow
हे देखील वाचा :
Sanjay Raut | मुख्यमंत्री एकनाथ शिंदेवर टीका करणं संजय राऊतांना भोवलं, नाशिकमध्ये गुन्हा दाखल
Ranbir Kapoor | रणबीर कपूरला पाहताच चाहतीने केले ‘हे’ कृत्य; व्हिडिओ व्हायरल
Pune Accident News | दुचाकीने दुभाजकाला धडक दिल्याने ज्येष्ठाचा मृत्यु