जळगाव : बहुजननामानामा : श्री विश्वकर्मा सुतार समाजातर्फे श्री विश्वकर्मा जयंती साजरी करण्यात आली. पुलवामा येथे शहीद झालेल्या सीआरपीएफ जवानांना रॅलीद्वारा श्रद्धांजली अर्पण करत शांततेत व साध्या पद्धतीने जयंती उत्सव साजरा करण्यात आला.
तत्पुर्वी विश्वकर्मा मंदिरामध्ये सामूहिक गीता पारायण संपन्न झाले. तसेचपुलवामा येथील दहशदवादी हल्ल्याचा निषेध करत जवानांना श्रद्धांजली अर्पण करुन रॅली काढण्यात आली.
मान्यवरांच्या हस्ते प्रभू विश्वकर्मा यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करत शहिदांना श्रद्धांजली वाहण्यात आली. त्यानंतर रॅलीस सुरुवात करण्यात आली. रॅलीत देशभक्तीपर गीतांसह पुलवामा घटनेच्या निषेध व्यक्त करणारे फलक हातात घेत समाजबांधव रॅलीत सहभागी झाले होते. मुख्य रस्त्याने ‘भारत माता की जय’, ‘वंदे मातरम्’, ‘शहीद जवान अमर रहे!’ आदी घोषणा देत रॅली लक्ष्मीनारायण नगरातील श्री. विश्वकर्मा मंदिरात दाखल होत येथे रॅलीचा समारोप करण्यात आला.
दरम्यान विविध क्षेत्रात यश प्राप्त करणारे समाजातील विद्यार्थी व बांधवांचा मान्यवरांच्याहस्ते गौरव करण्यात आला. यावेळी व्यासपीठावर अध्यक्षस्थानी आ. संजय सावकारे, प्रा. डॉ. सुनील नेवे, किरण कोलते, किशोर पाटील, पी.बी. सेलुकर, हभप चंद्रकांत महाराज, राजेंद्र दांडगे, एन.जे.वडदकर, डिगंबर जंजाळकर, दत्तु सूर्यवंशी उपस्थित होते. दरम्यान आ. संजयसावकरे यांनी उपस्थितांना संबोधतांना सांगितले की, आमदार निधीतून १५ लाख रुपयांचा निधी सभागृह बांधकामासाठी शासनाकडून मंजूर झालेला आहे.
समाजाने सभागृहाचा वापर लग्न कार्यासोबत समाजातील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक व विविध उपक्रमांसाठी करत प्रगती साधावी, असे आवाहन केले. प्रास्ताविक अशोक रुले यांनी केले. सूत्रसंचालन शांताराम पाटील (गुरुजी) यांनी केले. यशस्वीतेसाठी मनीषा दांडगे, स्वाती काळे, मेघना दांडगे, रेखा पराळे, कल्पना सोनवणे, राणी खैरनार, दिपाली जाधव, अर्चना वाघ, कल्पना चंदेले, रुपाली मिस्तरी, रेखा शिरसाठ, दीपक वाघ, सुनील जाधव, जितेंद्र काळे, किरण मिस्ती, राजू सोनवणे, राजू पराळे, संजय थोरात, विजय जंजाळकर, देवेंद्र चव्हाण, विलास रुले आदिंनी परिश्रम घेतले..