नंदुरबार : बहुजननामा ऑनलाईन- आदिवासी टायगर सेनेकडून आदिवासी क्षेत्रातील गावांचा अनुसूची क्षेत्रांमध्ये समावेश असूनही त्यांचा ‘पेसा’ कायद्या अंतर्गत समावेश करण्यात आलेला नाही. त्यामुळे या गावांना त्वरित पेसा कायद्याखाली आणावे, एक स्तर वेतन श्रेणी लागू करण्यात यावी, शहादा तालुक्यातील गट नंबर १३४/अ मध्ये सुरू असलेली खडीमशीन आणि खान पट्ट्याची योग्य ती चौकशी करून त्यावर दंडात्मक कारवाई व्हावी. आणि संबंधितांवर गुन्हे दाखल व्हावे, अशा विविध मागण्या यावेळी आंदोलनकर्त्यांनी केल्या आहेत.
आम्हाला संविधानाने दिलेले हक्क सनदशीर मार्गाने मागतो. आम्हाला कोणाच्या हातातील कठपुतळी म्हणून राहणे पसंद नाही. आदिवासी युवक हे शेर आहेत. बिरसामुंडा यांनी दिलेल्या शिकवणुकीवर आम्ही चालतो. आदिवासी टायगर सेनेच्यावतीने विविध प्रलंबित मागण्यांसाठी शहादा तहसील कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले आहे. यावेळी आदिवासी टायगर सेनेचे जिल्हा अध्यक्ष प्रवीण पावरा, तालुकाअध्यक्ष जोगिंदर दळवी, गोपाळ साहसे, आणि इत्तर कार्यकर्त्यांनी बेमुदत बिराडं आंदोलन केले. आणि सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करत सरकारचा निषेध केला.