पुणे : बहुजननामा ऑनलाईन – पुणे सातारा महामार्गावरील शिवापूर फाट्याजवळ सोमवारी रात्री साडेबाराच्या सुमारास दुचाकी आणि ट्रकचा भीषण अपघात झाला आहे. या भीषण अपघातात तीन जणांचा जागीच मृत्यू झाला असून ५ जण जखमी झाले आहे. जखमी झालेल्या या ५ जणांना भोरच्या श्लोक रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
मृत व जखमी तरुण पुण्यातील तळजाई परिसरामध्ये राहणारे आहे. हे आठ तरुण मित्राचा वाढदिवस साजरा करण्यासाठी तळजाई टेकडीवर गेले होते. यानंतर हे तरुण तीन दुचाकीवर शिवापूर येथे दर्ग्याला दर्शनासाठी निघाले. प्रवासादरम्यान त्यांची दुचाकी शिवापूर फाट्याजवळ आल्यानंतर हा अपघात घडला. कोंढणपूरजवळ तरुणांच्या दुचाकीला गॅसची वाहतूक करणाऱ्या ट्रकने चिरडले.
या अपघातात अनिकेत रणदिवे, सुशील कांबळे, सुरेश शिंदे या तिघांचा मृत्यू झाला आहे. तर करण जाधव, राकेश कुऱ्हाडे, अमर कांबळे, चेतन लोखंडे हे जखमी झाले आहे. जखमी झालेल्या या तरुणांवर रुग्णालयात उपचार चालू आहेत. या तीन जणांचा मृत्यू झाल्याने सगळीकडे शोककळा पसरली आहे.