नांदेड:-(प्रतिनिधी) – समविचारी पक्षासोबत युती करण्यासाठी बहुजन रयत पार्टीची बोलणी सुरु असून आघाडी करताना काही तांत्रिक अडचणी आल्या आहेत. म्हणून बहुजन रयत पार्टी स्वबळावर लढवणार आहे. असे प्रतिसाद पक्षाचे अध्यक्ष दिलीप मोहिते यांनी पत्रकार परिषद मध्ये म्हणाले .त्यामुळे कार्यकर्त्यांनी स्वबळाची तयारी जोमाने करावी असे आवाहन पार्टीच्या वतीन करण्यात आले आहे.
राज्य कमिटीची महत्व पूर्ण पदाधिकारी यांची बैठक भोकर येथील विश्रामगृहात पार पडली , राष्ट्रीय उपाध्यक्ष, महाराष्ट्र राज्य अध्यक्ष, विदर्भ युवा नेते,सर्व जिल्ह्यातील मोठे पदाधिकारी यांची महत्वपुर्ण बैठक रविवारी भोकर येथे पार पडली. या बैठकित हा निर्णय घेण्यात आला.
दिलीप मोहिते यांनी बोलताना म्हणाले की,महाराष्ट्र राज्यामध्ये विधानसभा निवडणूक अनुषंगाने बहुजन रयत पार्टीचे आमदार जास्ती जास्त कसे निवडून येतील यासाठी बहुजन रयत पार्टीचे काम जोमाने वाढवणे गरजेचे आहे.आम्ही आज आमचं भवितव्य मतपेटी वर विश्वास टाकत आहोत संबंध महाराष्ट्र भर असलेले बहुजन रयत पार्टीची कार्यकारणी ह्या साठी विधानसभा साठी चांगले उमेदवार देणार आहे. ही लढाई आमची वंचित बहुजन आघाडी सोबत नसून आमची ही लढाई सत्ता धारी असलेल्या भाजप सरकार विरोधी आहे. शेतकऱ्यांना न्याय मिळाला पाहिजे,स्वाभिमानी जीवन जगत असताना बहुजनांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागते त्याच बरोबर विधानसभेत सामान्य माणूस कसा निवडणूक लढून निवडून जाईल ह्या संविधानिक व फुले, शाहू च्या विचाराने चालणारा माझा पक्ष आहे असे ते यावेळी बोलले.
बहुजन रयत पार्टी निवडणुकीत जास्ती जास्त सभा कशा व कुठे कुठे घेणार,२८८ उमेदवार चारित्र्यवान,सर्वगुण सम्पन्न असले पाहिजे, निवडणुकीत पुरेसे पैसे खर्च करण्याची ताकद नसेल तरी तो प्रसिद्ध असला पाहिजे जनतेमध्ये चर्चेत असलेला पाहिजे. अशा उमेदवाराच्या चाचपणीसाठी बहुजन रयत पार्टीही ,राष्ट्रीय कमिटी,मराठवाडा उमेदवार निवड कमिटी,महाराष्ट्र राज्यासाठी समिती, यावेळी स्थापन करण्यात आली. यावेळी ह्या बैठकीला दिलीप मोहिते(राष्ट्रीय अध्यक्ष,बहुजन रयत पार्टी),डॉ.संजय लोखंडे (राष्ट्रीय उपाध्यक्ष),प्राचार्य आकाश लोखंडे,हेमंत मोहिते (अध्यक्ष मातंग सेवा संघ),माधव मेकेवाड(महासचिव),राजेंद्र चिल्कावार(युवक आघाडी, राज्य अध्यक्ष),सुप्रभा मांजरमकर(युवती आघाडी महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष),अक्षय मनवर(महाराष्ट्र अध्यक्ष, विद्यार्थी आघाडी),शुभम जाधव (मातंग सेवा संघ,राज्यअध्यक्ष ),राम पावडे(महाराष्ट्र उपाध्यक्ष),बालाजी चार्लेवाड(मराठवाडा उपाध्यक्ष),संजय नाईकडे(कार्याध्यक्ष,नांदेड), कु.मधू पाटील(युवती जिल्हा अध्यक्ष),नवनियुक्त कार्यनिरणी सुद्धा भोकर शहरात स्थापन केली गेली शेकडो तरुणांनी मा.मोहिते साहेब यांच्या सोबत फोटो काढून नियुक्ती पत्र घेऊन पक्षात प्रवेश केले.