मुंबई : बहूजननामा ऑनलाइन – विधानसभा निवडणूका डोळयासमोर ठेवून राज्य सरकार अनेक महत्वाचे निर्णय घेत आहे. आज (मंगळवार) झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत असाच एक निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे. या निर्णयामुळे नगरपालिका आणि मनपा कर्मचार्यांच्या पगारात भरघोस वाढ होणार आहे.
नगरपालिका आणि मनपा कर्मचार्यांना 2 सप्टेंबर पासून 7 वा वेतन आयोग लागू होणार आहे.
स्थानिक स्वराज संस्थांमधील नगरपालिका आणि मनपा कर्मचार्यांना 7 वा वेतन आयोग लागू होणार असल्यामुळे त्यांच्या पगारात भरघोस वाढ होणार आहे हे आता निश्चित झाले आहे. राज्यातील विधानसभेच्या निवडणूका शक्यतो ऑक्टोबर महिन्यात होणार असल्याचे भाजपाच्या नेत्यांनी विविध ठिकाणी केलेल्या वक्तव्यावरून स्पष्ट झाले आहे. रावसाहेब दानवे आणि गिरीश महाजन यांनी त्यांच्या भाषणादरम्यान विधानसभेच्या निवडणूकीच्या तारखेबाबत भाकित केले होते. त्याच पार्श्वभुमीवर राज्य सरकार अलिकडील काळात अनेक महत्वाचे आणि लोकउपयोगी निर्णय घेत आहे. आज (मंगळवार) झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नगरपालिका आणि मनपा कर्मचार्यांना 2 सप्टेंबर पासून 7 वा वेतन आयोग लागू करण्यास मंजूरी दिली आहे. नगरपालिका आणि मनपा कर्मचार्यांसाठी ही मोठी खुशखबर आहे.