पुणे : बहुजननामा ऑनलाईन – जल संसाधन विभाग (WRD) महाराष्ट्र भरती २०१९ : महाराष्ट्र जल संसाधन विभागा तर्फे ज्युनियर इंजीनिअर (सिविल) ग्रेड बीचे ५०० पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहे. काही शैक्षणिक पात्रता असलेले उमेदवार जल संसाधन विभाग महाराष्ट्र भर्ती २०१९ अधिसूचनांसाठी ऑनलाइन अर्ज करु शकतात.
सिविल अभियांत्रिकीमध्ये डिप्लोमा असलेले उमेदवार आणि ज्यांना सरकारी नोकरी हवी आहे त्यांच्यासाठी या नोकऱ्या मिळवण्यासाठी ही सुवर्ण संधी आहे. उमेदवार जल संसाधान विभाग (WRD) महाराष्ट्र भर्ती २०१९ चे एकूण ५०० रिक्त पदांसाठी अर्ज करू शकता जल संसाधन विभाग (WRD) महाराष्ट्र भर्ती २०१९ साठी अर्ज करण्यासाठी उमेदवारांनी १५ ऑगस्टला २०१९ पर्यंत किंवा त्याआधी ऑनलाइन अर्ज करायला हवे. ऑनलाइन अर्जाची सुरुवात २५ जुलै २०१९ रोजी होत आहे.
महत्वाच्या तारखा :
ऑनलाइन अर्ज सुरु होण्याची तारीख २५ जुलै २०१९
ऑनलाइन अर्ज जमा करण्याची शेवटची तारीख १५ ऑगस्ट २०१९
रिक्त पदे :
जुनियर इंजीनिअर (सिविल) ५०० पदे
शैक्षणिक योग्यता :
उमेदवारांकडे कोणत्या मान्यता प्राप्त संस्था/ विश्वविद्यालयकडून सिविल इंजीनिअरींगमध्ये डिप्लोमा असणे गरजेचे आहे.
पदांची शैक्षणिक योग्यता आणि अधिक माहितीसाठी अधिसूचना लिंकवर क्लिक करा.