मुंबई : बहुजननामा ऑनलाईन- शिवसेना आणि भाजपमधील सत्ता संघर्ष वाढत जात आहे तर दुसरीकडे राष्ट्रवादीने या वादात उडी घेतल्याचं पाहायला मिळत आहे. आशिष शेलार हे मांत्रिकाच्या संपर्कात आहेत, या विधानावरुन राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी आशिष शेलारांना चांगलाच टोला लगावला होता. त्यावर शेलारांनीही आव्हाडांना प्रतिउत्तर देत सुनावले आहे.
माझ्या इमारतीमधे राहणाऱ्या एका फँशन डिझाइनरला, फोटोग्राफरला, मांत्रिक ठरवणाऱ्या जितेंद्र आव्हाड यांना "भोंदूबाबा" म्हणावे का? असा प्रश्न पडतो. हास्यास्पदच आहे हे सारे! @Awhadspeaks @ThaneNCP @MiLOKMAT @LoksattaLive @abpmajhatv https://t.co/Z96Cb98Jc9
— Adv. Ashish Shelar – ॲड. आशिष शेलार (@ShelarAshish) November 18, 2019
आशिष शेलार यांनी पलटवार करत म्हंटल कि, ‘माझ्या इमारतीमध्ये राहणाऱ्या एका फँशन डिझाइनरला, फोटोग्राफरला, मांत्रिक ठरवणाऱ्या जितेंद्र आव्हाडांना “भोंदूबाबा” म्हणावे का ? असा प्रश्न पडतो. हे सारे हास्यास्पद आहे,’ सोबतच आशिष शेलार यांनी एक फोटो देखील शेअर केला आहे, यात या फॅशन डिझाइनरचं नाव फिरोज शकीर असं आहे. गेल्या ४० वर्षापासून ते बॉलिवूडमध्ये काम करतात. आशिष शेलार आणि फिरोज शकीर हे एकाच इमारतीत राहण्यास आहेत.
https://twitter.com/ThaneNCP/status/1196323550249934848
दरम्यान जितेंद्र आव्हाड यांनी एका वृत्त वहिनीला दिलेल्या मुलाखतीत म्हंटले होते कि , ‘कदाचित ते मांत्रिकांच्या संपर्कात असतील, तंत्रमंत्र केलं असेल, त्याने सांगितलं असेल अदृश्य शक्ती येईल मात्र या गोष्टींवर आमचा विश्वास नाही, आमच्या मनात शक्ती आहे, प्रचंड बलवान आणि एकनिष्ठ अशा शक्ती असतात. स्वत:चे विचार त्याच विश्वासावर आम्ही पुढे जातो. असं देखील आव्हाडांनी म्हंटल होत.
Visit : bahujannama.com