बहुजननामा ऑनलाईन टीम : राज्यात सत्ता स्थापनेचा तिढा सुटत नसल्याने अखेर राष्ट्रपती राजवट लागू झाली. मात्र शिवसेनेने सरकार स्थापनेचा दावा करत राष्ट्रवादीकडे पाठिंब्याची मागणी केली आहे. याच पार्श्वभूमीवर काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांची आज दिल्लीत बैठक पार पडली. बैठकीनंतर शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेत सत्ता स्थापने संदर्भात आपली भूमिका स्पष्ट केली.
Sharad Pawar after meeting Sonia Gandhi: We discussed in detail about Maharashtra's political situation. I briefed her on it. Mr. AK Antony was also there. Certain leaders of both(Congress-NCP) parties will meet and discuss further and get back to us pic.twitter.com/0QKsSsD8oD
— ANI (@ANI) November 18, 2019
पवार म्हणाले, आघाडीतल्या मित्रपक्षांना नाराज करू शकत नाही. महाराष्ट्रातल्या राजकीय परिस्थितीवर लक्ष ठेवणार आहोत, तसेच महाशिवआघाडीबाबत अजून आमचं काही ठरलं नसल्याचेही पवार यांनी पत्रकारांशी सांगितले. पवार पुढे म्हणाले, सोनिया गांधी त्यांच्यासोबतच्या भेटीत सत्ता स्थापनेबाबत कोणतीही चर्चा झाली नाही.
Sharad Pawar on if Sonia Gandhi is opposed to forming Govt in alliance with Shiv Sena: There was no talk of Govt formation in our meeting, this meeting was all about discussing Congress and NCP. https://t.co/26TnM7lhRf pic.twitter.com/rghFDkuc6A
— ANI (@ANI) November 18, 2019
Sharad Pawar on if Sonia Gandhi is opposed to forming Govt in alliance with Shiv Sena: There was no talk of Govt formation in our meeting, this meeting was all about discussing Congress and NCP. https://t.co/26TnM7lhRf pic.twitter.com/rghFDkuc6A
— ANI (@ANI) November 18, 2019
राज्यातील सत्ता स्थापनेबाबत आघाडीसोबत असणाऱ्या राजू शेट्टी यांच्या स्वाभिमानी शेतकरी संघटना व समाजवादी पक्ष तसेच काँग्रेसच्या अन्य नेत्यांसोबत चर्चा करणार असून त्यांना विश्वासात घेणार असल्याचेही शरद पवार यांनी सांगितले.त्यामुळे सोनिया गांधी यांच्यासोबत झालेल्या बैठकीत कोणताही ठोस निर्णय घेण्यात आलेला नाही. राज्यातील राजकारणाबाबत चर्चा झाली असली तरी अंतिम निर्णयावर शिक्कामोर्तब झालेलं नसल्याचे शरद पवार यांनी स्पष्ट केले.
Visit : bahujannama.com