मुंबई : बहुजननामा ऑनलाईन – अभिनेता सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणामध्ये दररोज नवनवीन घडामोडी घडत आहेत. आता या प्रकरणाला वेगळे वळण मिळालं आहे. या प्रकरणी ड्ग्जचा पुरवठा होत असल्याची माहिती मिळाल्याने Narcotics Control Bureau म्हणजे NCBने रिया विरुद्ध एफआयआर दाखल केली असून त्यामुळे रिया चक्रवर्तीच्या अडचणीत आणखी वाढ झाली आहे.
Narcotics Control Bureau registers a case in #SushantSinghRajput's death. pic.twitter.com/PhBj2mZRb6
— ANI (@ANI) August 26, 2020
अभिनेता सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणात अनेक धक्कादायक खुलासे होत आहेत. सीबीआय, ईडी आणि आता एनसीबी या तपास संस्था या प्रकरणात चौकशी करत आहेत. सुशांत सिंह राजपूत आणि रिया चक्रवर्ती यांना ड्रग्जचा पुरवठा केला जात होता याचे पुरावे ईडीला मिळाल्याचा दावा एनसीबीचे संचालक राकेश अस्थाना यांनी केला आहे.
दरम्यान, भाजपचे खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी देखील या संदर्भात वक्तव्य केलं होतं. एका हिंदी वृत्तवाहिनीने दिलेल्या वृत्तानुसार, ईडीने एनसीबीला पत्र पाठवले. या पत्रामध्ये ड्रग्ज संदर्भात पुरवे देण्यात आल्याची माहिती राकेश अस्थाना यांनी दिली आहेत. त्यामुळे आता एनसीबी देखील त्या दृष्टीने तपास करणार आहे.