बहुजननामा ऑनलाइन टीम – बॉलिवूड अभिनेता सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरणाचा तपास वेगात सुरू आहे. या प्रकरणाची चौकशी आता सीबीआयच्या ताब्यात असून या प्रकरणातील प्रत्येक बाबीची सखोल चौकशी करीत आहे. अलीकडेच सीबीआयची एक टीम एम्समध्ये गेली, त्यानंतर सुशांतच्या सर्व वैद्यकीय अहवालाची पुन्हा तपासणी केली जाईल, असे समोर आले. या व्यतिरिक्त सुशांतची सायकोलॉजिकल ऑटोप्सी केली जाईल. माहितीनुसार, शुक्रवारी एम्सचे डॉक्टर त्यांची चौकशी, सुशांतचे शवविच्छेदन आणि व्हिसेरा शुक्रवारी सीबीआयकडे सोपवतील. सुशांतच्या शवविच्छेदन आणि व्हिसेरा अहवालाचा अभ्यास करण्यासाठी चार डॉक्टरांची टीम तयार केली आहे. हे डॉक्टर पुन्हा गंभीरपणे त्याची तपासणी करतील.
गेल्या सोमवारी कूपर रुग्णालयाच्या डॉक्टरांनी सीबीआयकडे काही नवीन माहिती सादर केली आहे. दरम्यान सुशांतचे मागील शवविच्छेदन आणि उर्वरित वैद्यकीय अहवाल कूपर रुग्णालयातच बनले होते. सुशांतची साइकोलॉजिकल ऑटोप्सी म्हणजे मेंदूचे पोस्टमॉर्टम केल्याने त्याच्याबद्दल आवश्यक असलेल्या अनेक महत्त्वाच्या बाबी उघड होतील.
काय आहे सायकोलॉजिकल ऑटोप्सीचे महत्त्व ?
जेव्हा पोलिस किंवा सीबीआय असे करतात, अशा सुनंदा पुष्कर प्रकरणात… तेव्हा ते आत्महत्या आहे की नाही ते पाहतात. जर असेल, तर त्यावेळी त्याची मानसिक स्थिती काय होती? यात असे दिसून येते की त्याच्या मृत्यूच्या दहा दिवस आधी त्याच्या वागण्यात काय बदल होते. जसे तो कश्याप्रकारे बोलायचा, हरविल्यासारखा राहायचा कि नाही. सर्वसाधारणपणे, तो मित्रांशी जितका बोलतो तितका बोलायचं कि नाही. वेळेवर खातो किंवा नाही.