बहुजननामा ऑनलाइन टीम – सलग दोन लोकसभा निवडणुकीत दारुण पराभवाचा सामना करावा लागणाऱ्या काँग्रेसच्या अडचणी कायम आहेत. सोनिया गांधी हंगामी अध्यपदही कायम आहे. सोनिया गांधी रुग्णालयात असताना नेतृत्त्वावर प्रश्नचिन्ह निर्माण करण्यात आलेलं पत्र लिहिण्यात आल्याने राहुल गांधी यांनी नाराजी व्यक्त केली. त्यानंतर काँग्रेसचे वरिष्ठ नेते कपिल सिब्बल यांनी थेट राहुल गांधींचं नाव घेऊन टीका केली. मात्र, अवघ्या काही मिनिटांत त्यांनी ते ट्विट डिलीट केले. मात्र आता पुन्हा कपिल सिब्बल यांनी सूचक ट्विट केलं आहे.
आज पुन्हा कपिल सिब्बल यांनी एक ट्विट केलं आहे. त्यामुळे काँग्रेसमध्ये महाभारत सुरुच असल्याचे दिसून येत आहे. ही कोणाच्याही पदाची गोष्ट आहे. ही माझ्या देशाची बाब आहे, जी सर्वाधिक गरजेची आहे, असे सिब्बल यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे. सिब्बल यांच्या ट्विटवरुन ते बंड करण्याची शक्यता वर्तवली जात आहे. काल राहुल गांधी यांच्या विरोधात आक्रमक ट्विट करणाऱ्या सिब्बल यांनी आज वापरलेली भाषा अतिशय सौम्य पण सूचक आहे.
It’s not about a post
It’s about my country which matters most— Kapil Sibal (@KapilSibal) August 25, 2020
संजय झा यांचा काँग्रेसवर निशाणा
काँग्रेसमध्ये सुरु असलेल्या संघर्षावर पक्षातून निलंबित करण्यात आलेल्या संजय झा यांनी देखील काँग्रेसवर निशाणा साधला आहे. संजय झा यांनी म्हटले आहे की, ही अंताची सुरुवात आहे. अशा शब्दात झा यांनी काँग्रेसमध्ये सुरु असलेल्या संघर्षावर भाष्य केलं आहे. झा यांनी केलेल्या ट्विटमध्ये कोठेही काँग्रेसचा उल्लेख केला नाही. मात्र त्यांचा निशाणा काँग्रेसवर असल्याची चर्चा सुरु झाली आहे.
This is just the end of the beginning.
— Sanjay Jha (@JhaSanjay) August 25, 2020