बीड : बहुजननामा ऑनलाईन – अंबाजोगाई तालुक्यातील कुंभेफळ येथे राजमाता जिजाऊ, रमाई माता व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त संयुक्त कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी अभिवादन करुन विचारांचा जागर करण्यात आला. क्रांतीसूर्य फुले, शाहू, आंबेडकर सेवाभावी संस्था कुंबेफळ व अस्तित्व बहुउद्देशीय सेवाभावी संस्था कुंबेफळ यांच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम घेण्यात आला. प्रारंभी दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. अध्यक्षस्थानी सरपंच वृंदावनी वसंतराव भोसले होत्या.
प्रणिती शिंदे, डॉ. योगिनी थोरात, अंजली पाटील, मोहसीन खान, पृथ्वीराज साठे, मिलिंद बाबजे, विष्णू बुर्गे, परमेश्वर गिते, दादासाहेब कसबे, वीरश्री डाके, सालाम पठाण, बुद्धा जोगदंड, रोहिदास हातागळे, संजय कुंबेफळकर, चंद्रकांत इंगोले यांची प्रमुख उपस्थिती होती. या प्रसंगी सुजाता कसबे, शिवाजी बरकते, निकिता बुरसे, मीरा गुळभिले, वीरश्री डाके यांना गौरवचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले. गावातील गुणवंत विद्यार्थी, शिवजयंती समिती पदाधिकाऱ्यांचा मान्यवरांचा हस्ते सत्कार झाला. प्रस्ताविक रोहिदास हातागळे यांनी तर सूत्रसंचालन संजय कुंबेफळकर यांनी केले. आभार दादासाहेब कसबे यांनी मानले. समाधान पिसाळ, सुरज हातागळे, प्रकाश तोडकर, विजयकुमार इंगोले, सुबोध वाघमारे, विनोद इंगोले, राम चिवडे, सिद्धार्थ हातागळे, गणेश भोसले, अविनाश भोसले, वैभव बाबजे यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले.