धुळे : बहुजननामा ऑनलाईन – क्षत्रिय माळी समाज पंच मंडळातर्फे शैक्षणिक गुणगौरव समितीच्या माध्यमातून समाजातील पहिली ते पदव्युत्तरपर्यंतचे गुणवंत विद्यार्थी, कर्तृत्ववान व्यक्ती यांचा सत्कार व गुणगौरव सोहळा आर. सी. पटेल जिमखाना येथे पार पडला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आ. काशिराम पावरा होते. यावेळी महाराष्ट्र युवक काँग्रेस प्रदेश सरचिटणीस तपनभाई पटेल, उपविभागीय पोलिस अधिकारी संदीप गावित, तहसीलदार चंद्रशेखर देशमुख, पोलिस निरीक्षक संजय सानप, महिला व बालकल्याण सभापती वंदना गुजर, शिरपूर एज्युकेशन सोसायटीचे उपाध्यक्ष राजगोपाल भंडारी, एसव्हीकेएम चीफ अकाउंट व ॲडमिनिस्ट्रेटर राहुल दंदे, प्रा. डॉ. पायल दंदे, माजी उपनगराध्यक्ष सुरेश बागुल, माजी नगराध्यक्षा कुसुम बागुल, ॲड. एस. आर. सोनवणे, नगरसेविका छाया ईशी, शिक्षण सभापती वैशाली देवरे, नगरसेविका चंद्रकला माळी, कैलासचंद्र अग्रवाल, काँग्रेस तालुकाध्यक्ष प्रभाकरराव चव्हाण, समाजाचे अध्यक्ष बाबुलाल माळी, उपाध्यक्ष आत्माराम माळी, स्वीय सहाय्यक अशोक कलाल, नगर अभियंता माधवराव पाटील, प्रशासकीय अधिकारी संजय हासवाणी, काशिनाथ माळी, श्यामकांत ईशी, मोतीलाल माळी, उत्तमराव माळी, नितीन गिरासे, भटू माळी, वासुदेव देवरे, गुलाबसिंग परदेशी, दिपक गुजर, इरफान मिर्झा, उपस्थित होते.
याप्रसंगी पुलवामा येथे शहीद झालेल्या जवानांना श्रद्धांजली वाहण्यात आली. समाजातील पहिले ते पदव्युत्तरपर्यंतचे सर्व गुणवंत मुले, मुली यांना प्रमाणपत्रे व भेटवस्तू देवून गौरव करण्यात आला. तसेच आ.काशिराम पावरा यांच्या हस्ते क्षत्रिय माळी समाजाचे अध्यक्ष बाबुलाल भिका माळी, उपाध्यक्ष आत्माराम देवचंद माळी, एस.आर.महाजन यांचा सामाजिक कार्याबद्दल विशेष सत्कार करण्यात आला. कार्यक्रमासाठी श्री क्षत्रिय माळी समाज पंच मंडळ अध्यक्ष बाबुलाल भिका माळी, उपाध्यक्ष आत्माराम देवचंद माळी, कार्याध्यक्ष प्रभाकरराव तुकाराम चव्हाण, देविदास गंगाराम माळी, देविदास तुळशिराम चव्हाण, मोहन भिका माळी, मन्साराम महाजन, चंद्रकांत ताराचंद माळी यांचे मार्गदर्शन लाभले.
यशस्वीतेसाठी गुणगौरव समितीचे अध्यक्ष संजय आत्माराम चव्हाण, उपाध्यक्ष प्रा.एस.आर.महाजन, सचिव डी.बी.माळी, सदस्य जयेश गंगाधर महाजन, व्ही.जी.शेलकर, दीपक एकनाथ चव्हाण, नितीन करस्कार, विनोद माळी, तुषार माळी, संजय माळी, दिपक माळी, कमलेश माळी, प्रविण माळी, भुपेश माळी, महेंद्र माळी, एनएसयुआय जिल्हाध्यक्ष संदीप माळी, पवन महाजन, राहुल महाजन, जयेश माळी, महात्मा फुले नवयुवक मंडळ अध्यक्ष रविंद्र माळी, उपाध्यक्ष प्रमोद मगरे यांनी परीश्रम घेतले.
गुणगौरव सोहळ्याप्रसंगी सांस्कृतिक कार्यक्रम व नाटीका सादर करुन कार्यक्रमात उपस्थितांची दाद मिळवली. कार्यक्रमात महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे सरचिटणीसपदी निवड झाल्याबद्दल तपनभाई पटेल यांचा सत्कार करण्यात आला. प्रास्ताविक प्रभाकरराव चव्हाण यांनी केले. आ.अमरिशभाई पटेल व भुपेशभाई पटेल यांच्या मार्गदर्शनाखाली आर.सी.टेल शैक्षणिक संकुलात समाजातील मुलेमुली उच्च शिक्षण घेवून चांगल्या पदांवर विराजमान झाले आहेत. सामाजिक एकोपा असल्यानेच समाजाची प्रगती शक्य होते, असे चव्हाण यांनी सांगितले. सूत्रसंचालन मंजुषा चव्हाण, जयेश महाजन, प्रा. एस. आर. महाजन यांनी केले. आभार संजय चव्हाण यांनी मानले.