Pune Crime News | चारचाकी वाहन चोरणाऱ्या दोघांना विश्रामबाग पोलिसांकडून अटक

पुणे : – Pune Crime News | विश्रामबाग पोलीस ठाण्यात (Vishrambaug Police Station) दाखल असलेल्या चारचाकी वाहन चोरीच्या गुन्ह्यातील दोन आरोपींना तपास पथकाने अटक केली आहे (Arrest In Vehicle Theft) . पोलिसांनी गुन्ह्यातील चारचाकी गाडी जप्त केली आहे. संदीप दादु शिंदे (वय-35 रा. हनुमान नगर, कोथरुड), मल्हारी गोपाळ भोवळ (वय-42 रा. श्रमिक वसाहत, कर्वेनगर, पुणे) असे अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.
विश्रामबाग पोलीस ठाण्यात चारचाकी गाडी चोरून नेल्याप्रकरणी आयपीसी 379,34 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता. दाखल गुन्ह्याचा तपास करण्याचे आदेश वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिपाली भुजबळ यांनी तपास पथकाला दिले होते. तपास पथक आरोपींचा शोध घेत असताना पोलीस अंमलदार सातप्पा पाटील, मयुर भोसले व आशिष खरात यांनी तात्रिंक विश्लेषणद्वारे तपास केला. त्यावेळी हा गुन्हा संदीप शिंदे व मल्हारी भोवळ यांनी केल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार पोलिसांनी दोघांना ताब्यात घेऊन चोरीला गेलेली चारचाकी वाहन जप्त करुन गुन्हा उघडकीस आणला.
ही कारवाई पोलीस उपायुक्त परिमंडळ 1 संदिप सिंह गिल्ल, सहायक पोलीस आयुक्त साईनाथ ठोंबरे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिपाली भुजबळ, पोलीस निरीक्षक गुन्हे अरुण घोडके, पोलीस उपनिरीक्षक मनोज बरुरे, पोलीस अंमलदार राकेश गुजर, रेवन कंचे, अशोक माने, मयुर भोसले, गणेश काठे, महावीर वलटे, आशिष खरात, राहुल मोरे, साताप्पा पाटील, संतोष शेरखाने, अर्जुन थोरात, नितीन बाबर यांच्या पथकाने केली.
Comments are closed.