नवी दिल्ली : वृत्त – जम्मू काश्मीरमध्ये दोन दहशतवाद्यांसोबत रंगेहाथ पकडण्यात आलेल्या डीएसपीच्या प्रकरणाचा तपास करण्यासाठी सर्व तपास यंत्रणा एकवटल्या आहेत. डीएसपी देवेंद्र सिंहच्या दोन मुली बांग्लादेशमध्ये एमबीबीएसचे शिक्षण घेत आहेत. यामुळे तपास यंत्रणांना संशय आहे की मुलींच्या शिक्षणाचा खर्च हवालाच्या पैशांनी होत असावा. डीएसपीच्या घराच्या झडतीत लष्कराच्या 15 कोर चा संपूर्ण लोकेशन मॅप सुद्धा सापडला आहे.
लष्कराचा मॅप मिळाल्याने संशय व्यक्त केला जात आहे की, लष्कराची अनेक प्रकारची माहिती दहशतवादी आणि पाकिस्तानपर्यंत पोहचलेली असू शकते. सोबत साडेसात लाख रूपयांची रोख रक्कम जप्त करण्यात आली आहे. हा पैसा हवालाचा असण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. हिजबुल कमान्डर नवीद बाबूसोबत अटक करण्यात आलेला निलंबित डीएसपी देवेंद्र सिंहचे पाकिस्तान कनेक्शन शोधण्यासाठी तपास यंत्रणा कामाला लागल्या आहेत. त्याच्यासह त्याच्या नातेवाईकांच्या घरांचीही झडती घेण्यात आली आहे. डीजीपी दिलबाग सिंह यांचेही म्हणणे आहे की, या प्रकरणात मोठे कनेक्शन समोर येऊ शकते.
या प्रकरणाचे धागे कुठेही, कुणाशीही जोडलेले असू शकतात. हे मोठे प्रकरण आहे. यासाठी तपास नॅशनल इन्व्हेस्टीगेशन एजन्सी (एनआयए) कडे देण्याची शिफारस करण्यात आली आहे. डीएसपीला निलंबित करण्यासोबतच त्यास मिळालेले स्टेट अॅवार्डसुद्धा परत घेण्यात आले आहे. याप्रकरणी लवकरच एनआयए एफआयआर दाखल करणार आहे.
सूत्रांनी सांगितले की, शस्त्र आणि पैसे आणखी कुठे लपवले असण्याची शक्यता असल्याने देवेंद्र सिंहच्या नातेवाईकांच्या घरीसुद्धा तपास अभियान राबविण्यात आले. तपास करणार्या आयबी व रॉ सुद्धा डीएसपी आणि हिजबुल कमांडरची चौकशी करून दहशतवादी कनेक्शन शोधण्याचा प्रयत्न करत आहेत. दक्षिण काश्मीरमधील अनेक ठिकाणी छापे मारण्यात आले आहेत. देवेंद्र सिंहची चौकशी आणि त्याच्या ठिकाणांवर मारलेल्या छाप्यातून अनेक धक्कादायक गोष्टी समोर आल्या आहेत.
Visit : Bahujannama facebook page –
- ‘अॅपल टी’चे हे 4 फायेद वाचून व्हाल थक्क! जाणून घ्या ‘रेसिपी’
- संधिवाताची ‘ही’ आहेत 10 लक्षणे आणि 11 कारणे, जाणून घ्या महत्वाच्या गोष्टी
- रंग आणि आरोग्याचे ‘कनेक्शन’ ! जाणून घ्या ‘या’ 10 रंगांचे तुमच्यावरील परिणाम
- ‘या’ 6 पद्धतीने करा तुमच्या आयुष्यातून तणावाला हद्दपार
- ‘विराट’ आणि ‘सेरेना’नेही केला होता फॉलो, ‘वेगन डाएट’चे हे 6 फायदे जाणून घ्या