पटना : बहुजननामा ऑनलाईन – जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील संघटनेचा माजी विद्यार्थी नेता कन्हैय्या कुमार यांच्यावर आणखी एक गुन्हा दाखल झाला आहे. ४ मार्च रोजी कन्हैय्या कुमार यांनी प्रधानमंत्री यांच्या विरोधात आक्षेपार्ह वक्तव्य केले होते. त्यांच्या विरोधात भाजप नेते टिटू बडवाल यांनी ६ मार्चला हा खटला दाखल केला आहे.
जवाहरलाल नेहरू विद्यापीठात शिक्षण घेत असताना त्यांच्यावर आणि त्यांच्या साथीदारांवर देशद्रोहांचा गुन्हा दाखल झाला होता. तेव्हापासून कन्हैय्या कुमार हा भारतीय राजकारणात सक्रिय झाल्याचे दिसते. इंग्रजी प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार आगामी लोकसभा निवडणूक लढवून कन्हैय्या कुमारने राष्ट्रीय राजकारणात प्रवेश करण्याबाबत तमाम डाव्या संघटनांचे तसेच आरजेडी , काँग्रेस पक्षांनी त्यांना पाठिंबा दिला होता.
कन्हैय्या कुमार बिहारमधील बेगुसराय या लोकसभा मतदारसंघातून ‘कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया’ अर्थात सीपीआयच्या तिकिटावर निवडणूक लढणार आहे. तसेच. बिहारमध्ये भाजप आणि नितीशकुमारांच्या जदयुच्या शक्तिशाली आघाडीविरोधात लढण्यासाठी काँग्रेसने कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया सोबत महाआघाडी करण्याच्या प्रयत्नात असल्याचेही वृत्त आहे.
पण स्वतः कन्हैय्या कुमार किंवा डाव्या पक्षांकडून अद्याप या वृत्ताबाबत कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया व्यक्त करण्यात आलेली नाही. मात्र, काही दिवसांपूर्वीच खुद्द कन्हैय्यानेच आपण महाआघाडी झाल्यास निवडणूक लढण्यास तयार असल्याचे सूचक वक्तव्य केले होते.