मोहन विठोबा गोवर्धने, अंकुश निवृत्ती गोवर्धने, सागर भास्कर गोवर्धने, राहुल रावसाहेब गोवर्धने, भाऊसाहेब काशीराम गोवर्धने, प्रकाश गेणू गोवर्धने, शिवाजी कारभारी गोवर्धने, नाना बाळू गोवर्धन (सर्व रा. सांजेगाव, ता. इगतपुरी) अशी शिक्षा सुनावण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.
त्र्यंबकेश्वर तालुक्यातील तळेगाव अंजनेरी येथे एका अल्पवयीन मुलीवर झालेल्या अत्याचाराच्या घटनेनंतर आरक्षणाच्या मुद्द्यावर जिल्ह्यात दंगली उसळल्या होत्या. ११ ऑक्टोबर २०१६ रोजी सांजेगाव येथेही या घटनेचे पडसाद उमटले होते. घोषणाबाजी करीत आलेल्या जमावाने गावातील राजवाड्यातील घरांवर दगडफेक करीत येथील रहिवाशांना मारहाण सुरू केली. जमावाच्या हाती लागलेल्यांना लाठ्याकाठ्यांनी मारहाण करण्यात येऊन जातीवाचक शिवीगाळ करण्यात येत होती. या घटनेत शिवाजी बन्सी शिंदे, विजय बन्सी शिंदे, नकुसाबाई नामदेव सोनवणे, अलकाबाई सुरेश पवार, चिंतामण बाळू बुकाणे आदी गंभीर जखमी झाले होते. याप्रकरणी वाडीवऱ्हे पोलीस ठाण्यात २१ संशयितांवर जिवे ठार मारण्याच्या प्रयत्नासह जातिवाचक शिवीगाळ केल्याप्रकरणी ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.