बहुजननामा ऑनलाइन टीम – 21 वर्षांची इन्स्टाग्राम मॉडेल लुना बेनाला तिच्या सौंदर्यामुळे अडचणी येत आहेत. लुनाचा असा दावा आहे की, प्रसिद्ध डेटिंग अॅप(dating app) टिंडर वारंवार तिच्या ऑफिशियल अकाउंटला खूपच आकर्षक असल्याबद्दल बंदी घालत आहे.
लुना म्हणाली की, ती 2017 मध्ये या अॅपशी संबंधित होती, परंतु या अॅपवर येताच लोकांनी तिचे फोटो चोरण्यास सुरुवात केली आणि बनावट अकाउंट तयार करण्यास सुरुवात केली. लुना असेही म्हणाली की, फक्त टिंडरवरच नाही तर फेसबुकवरही तिचे फोटो चोरून एक बनावट अकाउंट तयार करण्यात आले असून, त्याचे हजारो फॉलोअर्स आहेत.
ती सुंदर असल्यामुळे लोकांनी तिला टिंडरवर धमकीदेखील दिली आहे आणि जेव्हा जेव्हा तिने या बनावट प्रोफाइलवर मेसेज करण्याचा प्रयत्न केला तेव्हा तिला वारंवार ब्लॉक केले जात असल्याचेही तिने सांगितले आहे. लुना म्हणाली की, लोक माझे फोटो बनावट प्रोफाइल तयार करण्यासाठी वापरतात आणि त्यानंतर त्यातून पैसे कमवतात हे दुर्दैव आहे.
लुनाच्या हजारो बनावट अकाउंटमुळे, समस्या अशी होती की टिंडर नावाचे अॅप्लिकेशन हा शोध लावू शकली नाही की, वास्तविक लुना आणि बनावट लुनामध्ये काय फरक आहे. हेच कारण आहे की जेव्हा जेव्हा लुना या अॅपवर ओरिजनल अकाउंट तयार करण्याचा प्रयत्न करते तेव्हा टिंडर तिला बनावट प्रोफाइल म्हणून ब्लॉक करते.
लुना या अॅपवरून काही डेट्सवर गेली आहे, आणि टिंडरवर बंदी घालण्याआधी ती एका व्यक्तीलाही भेटली ज्याला ती आता डेटिंग करत आहे. लुना म्हणाली की, ती या व्यक्तीच्या मित्रांना ओळखते, त्यामुळे तिला सुरक्षिततेची चिंता करण्याची गरज नाही. लुना म्हणाली की, या दोघांनाही फोटोग्राफी आणि मॉडेलिंगमध्ये रस आहे.
लुना केवळ टिंडर आणि फेसबुकवरच नव्हे तर इन्स्टाग्रामवरही खूप लोकप्रिय आहे आणि या अॅपवर तिचे 1 मिलियनपेक्षा जास्त फॉलोअर्स आहेत. इन्स्टाग्रामवर कमाई करण्याव्यतिरिक्त ती तिच्या ‘ओनली फॅन्स’ अकाउंटवरूनही पैसे कमावते.