ठाणे : बहुजननामा ऑनलाईन – दिव्यांगांसाठी तयार करण्यात आलेल्या गाडीतून चक्क दारूची तस्करी करण्यात आल्याचा प्रकार उघडकिस आला आहे. राज्य उत्पादन शुल्कच्या पथकाने डहाणूमध्ये एका दिव्यांगांच्या गाडीतून आठ ते दहा बॉक्स दारू जप्त केली आहे.
झाली या तीन चाकी गाडीमधून मद्यसाठा हस्तगत करण्यात आला आहे. या तस्करीकर्त्यांने गाडीचा संशय येऊ नये म्हणून अशी तीन चाकी गाडी तयार केली. या गाडीची तपासणी केल्यानंतर अधिकारी चक्क अश्चर्यचकीत झाले. चालकाच्या मागच्या बाजूला दोन बियरचे खोके लपवले होते. त्या गाडीवर आणखी एक कप्पा होता. त्या कप्प्यातसुद्धा दारुचा साठा आढळून आला. गाडीचा आकारही त्यांनी असा केला होता की त्या गाडीत दोन ते तीन दारुचे बॉक्स सहजपणे बसतील. आणि आठ ते दहा बॉक्स या तीन चाकी गाडीमधून आणता येतील. त्या गाडीला नंबरही नसल्याने त्यांच्यावर कारवाई करताना मद्यतस्कर भरारी पथकाच्या हाती लागले नाहीत. मंगळवारी आणि बुधवारी पथकाने ही गाडी पकडली होती. आणि या गाडीतील सर्व मद्यसाठा जपत केला आहे.
दरम्यान गुरुवारी डहाणूतील आशागड पोलीस चौकीजवळ एका घरामध्ये छापा टाकून हातभट्टी ची दारु तयार करण्यासाठी लागणारा काळागूळ, नवसागर, वजन काटा,अशा प्रकारचा माल जप्त केला आहे. त्या घराची पूर्ण तपासणी पथकाने केली आहे. ही कारवाई सुभाष जाधव , दुय्यम निरीक्षक,एस. आर.मिसाळ, आर ए. काटकर यांच्या पथकाने केली आहे.