लखनऊ बहुजननामा ऑनलाईन – हज यात्रेला जाणाऱ्या यात्रेकरूंना येणाऱ्या समस्या आणि अडचणी सोडविण्यासाठी एक मोबाईल अॅप तयार करण्यात आले आहे. हे अॅप काउंसिल जनरल ऑफ इंडियन हाजी इन्फर्मेशन सिस्टीम नावाने असणार आहे. हज यात्रेकरूंना फ्लाईटपासून ते मदिनामधील लोकेशनपर्यंत सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी या अॅपचा उपयोग होणार आहे. त्याचबरोबर हज सेवकांशी या अॅपच्या मदतीने संपर्कसुद्धा करता येणार आहे.
हज यात्रेकरांच्या सुरक्षा आणि त्यांच्या अडचणीवर मात करण्यासाठी एक अॅप लॉंन्च करण्यात आले आहे. हज यात्रेकरांना होणारा त्रासचा विचार करुन हे एक मोबाईल अॅप सुरु केले आहे. या अॅपमुळे हज यात्रेकरांना मोठ्या त्रासापासून वाचण्यासाठी मोठी मदत होणार आहे. या अॅपच्या मदतीने हज सेवकाशी संपर्कसुद्धा करता येणार आहे. आणि हज यात्रेला जाणार्या फ्लाईट पासून ते मदिनातील लोकेशनपर्यंत सर्व गोष्टी जाणुन घेता येतील. या अॅपच्या माध्यमातून हज यात्रेकरुना भारतीय हज कार्यालयाशी सहज संपर्क साधता येईल. या अॅपमध्ये एक टोल फ्री क्रमांक दिलेला आहे 8002477786 या क्रमांकावर फोन करुन आपल्या अडचणी सांगू शकता. हे अॅप प्ले स्टोअर मधुनही डाउनलोड करता येते. असे स्टेज हज कमिटीचे सचिव राहुल गूप्ता यांनी सागींतले आहे.
हे अॅप वापरण्यासाठी यामध्ये यात्रेकरांना आपला मोबाईल क्रमांक, पासपोर्ट क्रमांक,कव्हर क्रमांक नोंदविणे गरजेचे आहे. त्यानंतर हि माहिती अपडेट केल्यानंतर अॅप सुरु होउ शकते. या अॅपमधून हज यात्रेकरांना त्यासांठी सुविधा कोणकोणत्या आहेत सेवक कुठेकुठे थाबंले आहेत आणि हॉस्पीटल हॉटेल्स यासारख्या सुविधाबद्दलही माहिती माहिती मिळणार आहे. यामध्ये यात्रेकरुच्यां फिडबॅकची देखील सुविधा आहे. या अॅपवर हिंदी ,इंग्रजी आणि उर्दू या भाषांमध्ये एक फॉर्म भरुन यात्रेकरु फीडबॅक देऊ शकतील.