मुंबई : बहुजननामा ऑनलाइन – TET Exam Scam | सन २०१९-२०२० मधील महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत घेण्यात आलेल्या शिक्षक पात्रता परिक्षेमध्ये (टीईटी) झालेल्या गंभीर अनियमितता प्रकरणी (TET Exam Scam) सखोल चौकशी करुन अहवाल सादर करण्यासाठी अपर मुख्य सचिव (शालेय शिक्षण व क्रीडा विभाग) यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती गठित करण्यात आल्याची माहिती शालेय शिक्षण मंत्री प्रा.वर्षा गायकवाड (varsha gaikwad) यांनी दिली.
या समितीमध्ये आयुक्त (शिक्षण) पुणे (education commissioner pune) ; शिक्षण संचालक (प्राथमिक) पुणे (director of primary education pune); शिक्षण संचालक (माध्यमिक) पुणे; संचालक, माहिती तंत्रज्ञान संचालनालय, मुंबई हे सदस्य असतील. तर, अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे हे या समितीचे सदस्य सचिव असतील.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
उपरोक्त समिती सन २०१९-२०२० मध्ये झालेल्या शिक्षक पात्रता परीक्षेमध्ये (TET) तसेच जी.ए. सॉफ्टवेअर कंपनीने (ga software technologies pvt ltd) केलेल्या कामांमध्ये झालेल्या अनियमिततेची चौकशी (TET Exam Scam ) करून त्याबाबतचा प्राथमिक चौकशी अहवाल सात दिवसांत व सविस्तर चौकशी अहवाल १५ दिवसांत शालेय शिक्षण मंत्र्यांना (Maharashtra Education Minister) सादर करेल. याबाबतचा शासन निर्णय (Maharashtra Government Order) आज जारी करण्यात आला आहे.
Web Title :- TET Exam Scam | The Thackeray government took a big decision in the case of irregularities in the TET exam
Pune Crime | ‘साहब आपके कॉलर पर किडा है’ असं सांगून गळ्यातील सोनसाखळी पळवली