मुंबई : बहुजननामा ऑनलाइन – Thackeray Government | छत्रपती शिवाजी महाराज यांनी स्थापन केलेल्या स्वराज्याच्या रक्षणासाठी आणि विस्तारासाठी सर्वोतम योगदान देणारे छत्रपती संभाजी महाराज (Chhatrapati Sambhaji Maharaj Memorial) यांच्या कार्यकर्तृत्वाचा गौरव करणारे, त्यांच्या व्यक्तिमत्वाला साजेसे, भव्य दिव्य असे स्मारक उभारण्यात येणार आहे. याबाबतचा निर्णय ठाकरे सरकारकडून घेण्यात आला आहे. छत्रपती संभाजी महाराजांच्या स्मारक उभारणीच्या कामाला राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी आज (सोमवारी) मंजूरी दिली. (Thackeray Government)
उपमुख्यमंत्री कार्यालयाच्या समिती कक्षात झालेल्या बैठकीत या स्मारकाच्या आराखड्यासाठी स्पर्धेचे आयोजन करण्यात येणार आहे. त्यातून सर्वोत्कृष्ट आराखड्याची निवड करण्यात येणार आहे. त्याचबरोबर या स्मारकाचे काम करत असताना आगोदर स्थानिकांशी चर्चा करावी. त्यांना विश्वासात घेऊन काम करण्यात यावे अशा सूचना देखील अजित पवार (Ajit Pawar) यांनी संबधित अधिका-यांना दिल्या. (Thackeray Government)
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
छत्रपती संभाजी महाराजांच्या कार्यकर्तृत्वाला साजेसे स्मारक पुण्यातील वढु बुद्रुक (Vadhu Budruk) येथे उभारण्यात यावे. हे स्मारक उभारताना त्याला ‘हेरिटेज’ टच असावा. स्मारकाचे काम करताना छत्रपती संभाजी महाराजांच्या समकालीन वास्तुरचनांचा आधार घ्यावा. वढु बुद्रुक येथे छत्रपती संभाजी महाराजांच्या समाधीचे दर्शन घेण्यासाठी, त्यावर नतमस्तक होण्यासाठी दरवर्षी लाखो नागरिक येतात. येथे दर्शनासाठी येणाऱ्या चाहत्यांची योग्य सोय व्हावी, याची काळजी घेण्यात यावी. तसेच, छत्रपती संभाजी महाराजांच्या समाधीचे पावित्र्य जपून परिसराच्या विकासाचे काम, सर्वांच्या संमतीने, सर्वांना सोबत घेऊन स्वरुपात करण्यात यावे, असं देखील अजित पवार (Ajit Pawar) यांनी यावेळी सांगितलं आहे.
Web Title :- Thackeray Government | chatrapti sambhaji maharaj smarak desigion taken by thackeray government
TET Exam Scam | टीईटी परीक्षेतील अनियमितता प्रकरणी ठाकरे सरकारनं घेतला मोठा निर्णय