पुणे : बहुजननामा ऑनलाइन – Rupali Thombre Patil | भाजपचे (BJP) प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी नाव न घेता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (NCP) अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्यावर टीका केली होती. ‘पंतप्रधान पदाचे स्वप्न पाहणाऱ्या पक्षाला जे जमलं नाही ते भारतीय जनता पक्षाने महाराष्ट्रात करून दाखवलं. असं चंद्रकांत पाटील म्हणाले. या विधानावरुन आता मनसेला रामराम करुन राष्ट्रवादी काँग्रेसचं (NCP) घड्याळ हाती बांधलेल्या रुपाली ठोंबरे पाटील (Rupali Thombre Patil) यांनी चंद्रकांत पाटलांवर निशाणा साधला आहे.
खा.शरद पवार साहेबांच्या वर टीका करण्यासाठी एका राष्ट्रीय पक्षाने नेमलेल्या राज्याच्या अध्यक्षाला स्वतःच्या मतदार संघात आमदार होता आले नाही ; पुरात वाहून आलेले पुण्याचे स्वयंघोषित दादा
— Rupalipatilthombare (@Rupalispeak) December 20, 2021
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
रुपाली ठोंबरे पाटील (Rupali Thombre Patil) यांनी ट्विटच्या माध्यमातून म्हणाल्या की, ‘शरद पवार साहेबांच्यावर टीका करण्यासाठी एका राष्ट्रीय पक्षाने नेमलेल्या राज्याच्या अध्यक्षाला स्वतःच्या मतदार संघात आमदार होता आले नाही. पुरात वाहून आलेले पुण्याचे स्वयंघोषित दादा.., असा टोला त्यांनी चंद्रकांत पाटलांना लगावला.
काय म्हणाले होते चंद्रकांत पाटील?
‘2014 च्या निवडणुकीत पहिल्यांदाच एखाद्या पक्षाला 100 पेक्षा जास्त आमदार निवडून आणता आले. 2019 मध्येही 105 आमदार निवडून आले. देशाचे पंतप्रधान होण्याचे स्वप्न पाहणाऱ्या पक्षालाही या महाराष्ट्रात 60 च्या वर आमदार निवडून आणता आले नाही. देशात अनेक वर्ष राज्य केलेल्या काँग्रेसलाही 70 पेक्षा जास्त आमदार निवडून आणता आले नाही. आणि नरेंद्र मोदींच्या (PM Narendra Modi) नावावर मते मागून धोका देणाऱ्या शिवसेनेलाही (Shivsena) 73 च्या वर आमदार निवडून आणता आले नाही. परंतु भाजपच्या (BJP) कार्यकर्त्यांनी बूथ संपर्क योजनेच्या जोरावर 100 हुन जास्त आमदार निवडून आले असल्याचे ते म्हणाले.
Web Title :- Rupali Thombre Patil | those who criticized sharad pawar could not have mla their own constituency said Rupali Thombre Patil.
LIC च्या पॉलिसी सोबत अपडेट केले नसेल PAN Card तर तात्काळ करा ‘हे’ काम, जाणून घ्या पूर्ण प्रक्रिया