श्रीनगर : वृत्तसंस्था – जम्मूच्या बाहेरील टोल प्लाझावर दहशतवाद्यांनी शुक्रवारी पहाटे पोलिसांवर हल्ला केला.यानंतर सुरक्षा दलांशी झालेल्या चकमकीत 3 अतिरेकी ठार झाले. सध्या 2 दहशतवाद्यांचा शोध सुरू आहे. या चकमकीत एक पोलिस कर्मचारीही जखमी झाल्याची माहिती आहे. वृत्तसंस्था पीटीआयच्या वृत्तानुसार, शुक्रवारी पहाटे जम्मू-श्रीनगर राष्ट्रीय महामार्गावरील बॅन टोल प्लाझावर ट्रकमधून प्रवास करणाऱ्या 3-4 दहशतवाद्यांच्या पथकाने गोळीबार केला. त्यानंतर लवकरच सुरक्षा दलाने शोधमोहीम राबविली आणि त्यांना दहशतवाद्यांचा शोध लागला.
आज सर्व शाळा बंद
चकमकीनंतर राष्ट्रीय महामार्गही बंद करण्यात आला आहे.श्रीनगरमधील पोलिस पथकाने ट्रक रोखला आणि नगरोटाच्या बान परिसरातील टोल प्लाझाजवळ तपासणीसाठी थांबविले तेव्हा पहाटे पाच वाजता गोळीबार झाला, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.सावधगिरी म्हणून उधमपूर जिल्हा, टिकरी, मांड, राष्ट्रीय महामार्ग-क्षेत्र, चेनानी भागातील सर्व शाळा आजसाठी बंद ठेवण्याचे आदेश उधमपूर जिल्हा दंडाधिकाऱ्यांनी दिले आहेत.
दहशतवादी त्याच ट्रकमध्ये होते
जम्मू-काश्मीरचे पोलिस महासंचालक दिलबाग सिंह यांनी सांगितले की, एक दहशतवादी मारला गेला, तर इतर पळून जाण्यात यशस्वी झाले. दहशतवाद्यांना पकडण्यासाठी मोठ्या प्रमाणात शोध मोहीम सुरू करण्यात आली आहे. हे दहशतवादी नवीन घुसखोरी गटाचे असून ते श्रीनगरला जात होते. त्यांनी कठुआ, हीरानगर हद्दीत घुसखोरी केली असल्याची भीती व्यक्त केली जात आहे.त्याच वेळी जम्मू-श्रीनगर महामार्गावरील बॅन टोल प्लाझाजवळ स्फोटाचा आवाज ऐकू आला, तिथे अतिरेकी आणि सुरक्षा दलांमध्ये चकमकी सुरू आहेत.