तेलंगणा : वृत्तसंस्था – लोकसभा निवडणुकीत प्रचंड बहुमताने निवडून आलेल्या भाजप सरकारमुळे देशातील अल्पसंख्यांक आणि एसी-एसटी समाजातील अनेक लोकांमध्ये भीतीचे वातावरण आहे त्यातच तेलंगणामधील आदिलाबाद येथील एका खासदाराने मुस्लिम तरुणांचे गळे कापण्याची धमकी दिली आहे.
भाजपा खासदार सोयम बापूराव या खासदाराचे नाव असून आदिवासी जिल्ह्यात मुस्लिम तरुण आदिवासी महिलांचं शोषण करत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. आपण हे अजिबात सहन करणार नाही. याप्रकरणी भाजपा खासदार सोयम बापूराव यांच्याविरोधात अल्पसंख्यांक नेत्यांनी तक्रार दाखल केली आहे. याप्रकरणी अल्पसंख्यांक नेते साजिद खान यांनी सोयम बापूराव यांच्याविरोधात तक्रार दाखल केली आहे. साजिद खान यांनी हे वक्तव्य अत्यंत चुकीचं असल्याचं सांगत पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी सबका साथ सबका विकास और सबका विश्वास संबंधी बोलतात पण त्यांचेच नेते वादग्रस्त वक्तव्य करतात असे टीआरसचे नेते एम कृषंक यांनी याचा निषेध करताना म्हटलं आहे. भाजपाला तेलंगणामध्ये आपली ताकद निर्माण करण्यासाठी भाजप नेते अशी विधाने करत आहेत.
आता सध्या भाजपात खासदार असलेले सोयम बापूराव याआधी तेलंगणा राष्ट्र समिती आणि काँग्रेसमध्ये होते. २००४ साली टीआरएसच्या तिकीटवर निवडणूक जिंकल्यानंतर त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. २०१८ मध्ये विधानसभा निवडणुकीत त्यांचा पराभव झाल्यानंतर अलीकडेच त्यांनी भाजपात प्रवेश केला आहे.