मुंबई : बहुजननामा ऑनलाइन – लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे बंडखोर नेते आणि माजी विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी राजीनामा देत भाजपा सरकारमध्ये प्रवेश केल्यानंतर विरोधी पक्षनेतेपद रिक्त होते. या पदावर काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांची विधानसभेच्या विरोधी पक्षनेतेपदी निवड करण्यात आली आहे विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात राष्ट्रवादीने पाठिंबा दिल्यानंतर आज विजय वडेट्टीवार यांची निवड करण्यात आली.
विधानसभेचे विरोधी पक्षनेतेपद रिक्त असल्यामुळे या जागेवर काँग्रेसच्या विजय वडेट्टीवार यांची नियुक्ती करावी, अशी मागणी काँग्रेस-राष्ट्रवादीकडून होत होती. विजय वडेट्टीवार यांची निवड झाल्यानंतर मुख्यमंत्र्यांसह, गृहमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनीही वडेट्टीवार यांचे जागेवर जाऊन अभिनंदन केले.
दरम्यान, काँग्रेसने विजय वडेट्टीवार यांची काँग्रेसच्या गटनेतेपदी निवड केली होती. त्यांना विरोधी पक्षनेते करण्याबाबत आघाडीने विधानसभाध्यक्ष हरिभाऊ बागडे यांना पत्रही पाठविले होते.
शिवसेनेच्या आमदार नीलम गोऱ्हे यांची विधान परिषदेच्या उपसभापतीपदी निवड करण्यात आली आहे. जोगेंद्र कवाडे यांनी माघार घेतल्याने गोऱ्हे यांची बिनविरोध निवड झाली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.
Senior Congress leader Vijay Wadettiwar appointed as the new leader of Opposition (LoP) in the Maharashtra Legislative Assembly. pic.twitter.com/MHgH6DZvLj
— ANI (@ANI) June 24, 2019