मुंबईः बहुजननामा ऑनलाईन – कोरोना संकटकाळात अनेक ठिकाणी माणूसकी हरवल्याच्या, प्रशासनाच्या नाकर्तेपणाच्या घटना समोर येत आहेत. अशातच भाजपा BJP नेत्या चित्रा वाघ Chitra Wagh यांनीही बुलडाणा जिल्ह्यातील संग्रामपूरची अशीच एक घटना उघडकीस आणली आहे. वाघ यांनी ट्विटरवरुन एक व्हिडिओ शेअर केला आहे. त्यात एका 8 वर्षीय शाळकरी मुलाला धमकावून त्याच्याकडून कोविड सेंटरमधील संडास साफ करुन घेतल्याची संतापजनक घटना घडल्याचे त्यांनी सांगितले आहे. तसेच याप्रकरणी कारवाईची मागणीही केली आहे. चित्रा वाघ यांच्या ट्विटवर काही जणांना संग्रामपूरचे स्थानिक आमदार संजय कुटे हे भाजपाचेच BJP असल्याची आठवण करुन दिली. तसेच स्थानिक भाजपा आमदाराची जबाबदारी नाही का? असा सवालही नेटकऱ्यांनी वाघ यांना विचारला आहे.
अतिशय गंभीर व संतापजनक प्रकार बुलढाणा संग्रामपूर तालुका मारोड गावी शाळेच्या विलगीकरणकक्ष जिथे १५ कोविड पेशंट असतांना ८ वर्षाच्या मुलांकडून धमकावून toilet साफ करून घेतल जातयं लाज वाटली पाहिजे प्रशासनाला
विशेष म्हणजे या मुलाला धमकावून toilet साफ करून घेतलं@DrShingnespeaks pic.twitter.com/X55pIg8Qtg— Chitra Kishor Wagh (@ChitraKWagh) May 30, 2021
अतिशय गंभीर व संतापजनक प्रकार बुलढाणा जिल्ह्यातील मारोड गावातील शाळेच्या विलगीकरण कक्षात घडला आहे. या विलगीकरण कक्षात 15 कोविड पेशंट असतांना 8 वर्षाच्या शाळकरी मुलाला धमकावून त्याच्याकडून संडास साफ करून घेतले आहे. लाज वाटली पाहिजे प्रशासनाला, असे म्हणत चित्रा वाघ Chitra Wagh यांनी जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांना ट्विटमध्ये मेन्शन केले आहे.
भरधाव दुचाकीनं रस्ता क्रॉस करणार्या 7 वर्षाच्या सियाला उडवलं; चिमुरडी गंभीर जखमी
तेजश्री प्रधाननं पहिल्याच हिंदी सिनेमात दिलाय लीप लॉक, चित्रपट अद्याप…
नवी मुंबईत भाजपला हादरे सुरुच, मोठ्या नेत्याचा ‘मनसे’त प्रवेश
‘पवित्र रिश्ता 2’ करण्यास उषा नाडकर्णी यांचा नकार, जाणून घ्या कारण