बहुजननामा ऑनलाईन- मुंबईतील माटुंगामध्ये प्रसिद्ध कलाकार आणि फोटोग्राफर राम इंद्रनील कामतने आत्महत्या करून त्याचे जीवन संपवले आहे. बाथटबमध्ये रामचा मृतदेह मिळाला. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून त्यांनी मृतदेह ताब्यात घेतला आहे.
राम गेल्या काही दिवसांपासून तणावामध्ये होता आणि लॉकडाऊन काळात ही परिस्थिती आणखी बिघडत गेली. पोलिसांना त्याच्या घरी एक सुसाइड नोट मिळाली आहे. याप्रकरणी मुंबई पोलिसांनी अपघाती मृत्यूची नोंद केली आहे. या घटनेसाठी त्याने कुणालाही जबाबदार धरले नाही आहे. सध्या पोलीस त्याचे कुटुंबीय आणि जवळच्या व्यक्तींची चौकशी करत आहेत. तो प्रोफेशनली चित्रकार होता. त्याची ग्लासवर्क पेंटिंग मुंबईतील आर्ट सर्किटमध्ये विशेष प्रसिद्ध होती. दरम्यान, कोरोना काळात अनेक कलाकारांनी आत्महत्येचे पाऊल उचलले आहे. अभिनेत सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूने तर संपूर्ण सिनेसृष्टी हादरली आहे.