बहुजननामा ऑनलाईन – सहारसा विहरा वेला सिहोल येथील एका महिलेला तिच्याच पतीने गंगा नदीत ढकलून दिलेली घटना समोर आली आहे. एसडीआरएफ च्या सतर्कतेमुळे महिलेचे प्राण वाचवण्यात आले. आशा देवी असे या महिलेचे नाव आहे. अमोद कुमार असे आरोपीचे नाव आहे. पत्नीला गंगा मध्ये ढकलून या घटनेला अपघात ठरवण्याचा विचार अमोद कुमार याच्या डोक्यता होता. परंतु त्या क्षणी एसडीआरएफच्या कर्मचाऱ्यांमुळे आशाचे जीव वाचले.
पतीचा होता अनैतिक संबंध
महिलेने शुद्धीवर आल्यानंतर सांगितले, अमोद याचा कोणा एका महिलेसोबत अनैतिक संबंध होता. परंतु आशा नेहमी याचा विरोध करत असल्याने अमोदने आशाला मारून टाकण्याची योजना बनवली. आणि रविवारी पहाटे अमोद ने आलमगंज भागातील गंगा नदीत आशा यांना ढकलून दिले.
एसडीआरएफनी याबाबद्दल दिलेली माहिती अशी, रविवारी पहाटे साडे चार वाजता एक महिला आलमगंज भागातील गंगा नदीत बुडताना तेथील इंडियन वॉटर व्हेज अथॉरिटीच्या कर्मचाऱ्यांना दिसली. एसडीआरएफ टीमना याबाबत सूचना मिळताच एसडीआरएफच्या पथकांनी गयाघाट पासून घटनास्थळी धाव घेतली. आणि महिलेला वाचवले.