अमृतसर बहुजननामा : सोशल मीडिया हे मनोरंजनाचं एक असं फ्लॅटफॉर्म आहे कि , ज्याद्व्यारे चांगली आणि वाईट दोन्ही प्रकारची प्रसिद्धी मिळते. नेटप्रेमी वेगवेगळ्या पोस्ट आणि विडिओ टाकून प्रसिद्ध होण्यासाठी आजकाल कोणत्याही थराचे कृत्य करताना दिसत आहेत. असाच एक गोंधळ माजवणारा विडिओ सोशल मीडियावर वायरल झाला आहे. ज्यामध्ये एक महिला धूम्रपान करत धुराचे लोट सोडताना तसेच साथीदारांसोबत ठुमके लावताना दिसत आहे.
आपल्या साथीदारांसोबत धूम्रपान करत नाचताना हा ५० सेकंदाचा विडिओ सोशल मीडियावर जास्त प्रमाणात बघितला जात आहे. समाजाच्या नाजूक घटकांवर परिणाम करणारा हा विडिओ आहे. या विडिओ मध्ये महिला धूम्रपान वरच थांबली नाही तर , मद्यपान करताना देखील दिसत आहे. दारूची बाटली हातात घेत, साथीदारांसोबत संगीताचा ताल धरत ही महिला ठुमके लावताना दिसते. साथीदारदेखील महिलेच्या या कृत्याची वाहवाह करताना, टाळ्या वाजवताना दिसत आहे.
या विडिओ बाबत पंजाब च्या राज्य महिला अयोग्य अध्यक्षा मनीषा गुलाटी यांचे म्हणने आहे कि , “ह्या विडिओ मध्ये जे दिसत आहे , ते समाजाच्या दृष्टीने अत्यंत घातक आहे. श्रद्धा, आस्था च्या नावाखाली खेळ मांडला जात आहे.” पोलिसांनी या विडिओची पडताळणी करत विडिओ अपलोड करणाऱ्यावर कारवाई केली आहे.