SBI ची विशेष सेवा आपली बँक शाखा काही मिनिटांत बदलू शकते, प्रक्रिया काय आहे ते जाणून घ्या?

नवी दिल्ली : वृत्तसंस्था- स्टेट बँक ऑफ इंडिया (एसबीआय) ग्राहकांना सर्व सुविधा ऑनलाईन उपलब्ध करून देण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. आपल्या ग्राहकांना घरी सर्व सुविधा देण्याचा एसबीआयचा प्रयत्न आहे. त्यानंतर आता बचत खाते ऑनलाईन ट्रान्सफर सर्व्हिस सुरु करण्याची सुविधा बँकेने सुरु केली आहे. आधी यासाठी ग्राहकांना बँकेत जावे लागत असे. मात्र आता या पद्धतीमुळे काही मिनिटातच ग्राहक हे काम करू शकणार आहेत. या सुविधेमार्फत तुम्ही तुमचे बचत खाते थेट दुसऱ्या बँकेत ऑनलाईन ट्रान्सफर करू शकणार आहात.
यासाठी बँकेने आपल्या इंटरनेट बँकिंगमध्ये काही पर्याय दिले असून तुम्ही खालील क्रमाने या सुविधेचा लाभ घेऊ शकता.
१] तुम्ही लॉग इन केल्यानंतर तेथे तुम्हाला होम पेजवर ‘ई-सर्व्हिसेस’ चा पर्याय मिळेल. त्यावर क्लिक करा.
२] या पर्यायावर क्लिक केल्यानंतर ‘Transfer of Savings Account’ हा पर्याय निवडायचा आहे.
३] यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमच्या अकाउंटसचे सर्व डिटेल्स दिसतील. त्यानंतर तुम्हाला कोणते अकाउंट ट्रान्सफर करायचे आहे ते निवडावे लागेल.
४] तुम्हाला ज्या शाखेत हे अकाउंट ट्रान्सफर करायचे आहे त्याचा कोड तुम्हाला याठिकाणी टाकावा लागणार आहे. त्यानंतर शाखेची माहिती येईल.
५] नियम आणि अटी यांचा स्वीकार केल्यानंतर तुम्हाला सबमिट हे बटन दाबावे लागणार आहे. सर्व काम पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला कन्फर्म हे बटन दाबायचे आहे.
६] तुम्ही कन्फर्म हे बटन दाबल्यानंतर तुमच्या मोबाइलवर एक सेक्युरिटी कोड येईल. हा कोड टाकल्यानंतर तुमची प्रक्रिया पूर्ण होईल.
७] तुमची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला तुमचे अकाउंट ट्रान्सफर झाल्याचा मॅसेज येईल.
- त्वचा आणि केसांच्या सौंदर्यासाठी आहे ‘हा’ खास उपाय, होतील ‘अमेझिंग’ फायदे
- आपल्या मुलांना द्या रोज एक अंडे, होतील ‘हे’ ९ मोठे आरोग्यदायी फायदे
- रजोनिवृत्तीनंतरही रक्तस्राव होत असेल तर काढावी लागते गर्भपिशवी
- महिन्यात परत मासिक पाळी आली तर करा ‘हे’ उपाय, जाणून घ्या कारणे
- ‘हे’ घरगुती उपाय आठवड्यातून २-३ वेळा करा, दूर होईल ‘नाभी इन्फेक्शन’
- पपईच्या रसाने होतात ‘हे’ खास ७ फायदे, रस घेण्यापूर्वी करा ‘हे’ एक काम
- आयुर्वेदानुसार पाणी किती आणि कधी प्यावे ? यामुळे कोणकोणते होतात लाभ
Comments are closed.