अहमदनगर : बहुजननामा ऑनलाईन – लहूजी शक्ती सेनेच्या वतीने मातंग समाजाच्या विविध मागण्यांसाठी मंगळवारी पाथर्डीच्या स्व. वसंतराव नाईक चौकात रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. नायब तहसीलदार प्रकाश नेवसे यांनी आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. लोकसंख्येच्या प्रमाणात आरक्षण मिळावे, आद्य गुरू लहुजी वस्ताद यांच्या समाधीचे काम सुरू करावे, अण्णाभाऊ साठे विकास मंडळास निधी मिळावा, नगरपालिकेच्या वतीने अणाभाऊ साठे स्मारकास जागा उपलब्ध करून द्यावी, आदी मागण्यांसाठी लहुजी सेनेचे जिल्हाध्यक्ष सुभाष घोरपडे यांच्या नेतृत्वाखाली पाथर्डी येथील नाईक चौकात रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.
या वेळी लहुजी सेनेचे जि. अध्यक्ष सुभाष घोरपडे, महाराष्ट्र नविनर्माण सेनेचे तालुकाध्यक्ष संतोष जिरेसाळ, प्रवीण शिरसाट, उपजिल्हाध्यक्ष गणेश दिनकर, आनंद पवळे ,आकाश काळोखे, शशिकांत वाघमारे, खंडू दिनकर, सचिन दिनकर, लखन काळोखे, शांताबाई साळवे, मंडाबाई दिनकर, सविता घोरपडे, विमलाबाई दिनकर, वैभव दिनकर, शुभम दिनकर, मुरली दिनकर, बबन शिरसाट, विजय बोरुडे, संतोष वाघमारे, दिनेश ससाणे, आत्माराम सोनवणे, प्रशांत साळवे आंदोलनात सहभागी झाले होते. या वेळी नायब तहसीलदार पंकज नेवसे व पो. नि. रमेश रत्नपारखी यांना निवेदन देण्यात आले.