मुंबई : बहुजननामा ऑनलाईन – सरकारच्या मुद्रा योजना अंतर्गत तुम्हाला सहज कर्ज मिळेल. तुम्ही जर कमी गुंतवणुकीमध्ये व्यवसाय चालू करत असाल तर या योजने बद्दल आपण काही जाणून घेऊ. व्यवसाय सुरु करण्यासाठी तुम्हाला स्वतःला फक्त २ लाख रुपये लावावे लागतील बाकी पैसे केंद्र सरकार तुम्हाला देईल. सरकारच्या मुद्रा योजने अंतर्गत तुम्हाला सहज कर्ज भेटेल.
टोमॅटो सॉसचा व्यवसाय –
टोमॅटो सॉस हा पदार्थ दररोज सेवन केला जातो. टोमॅटो सॉसला सहसा घरामध्ये आणि हॉटेल- रेस्टोरंट मध्ये जास्त डिमांड असते. सध्याच्या काळात मार्केट मध्ये मोठमोठ्या ब्रँड सोबतच लोकल ब्रँड देखील उपस्थित आहेत. जर लोकल ब्रँडची क्वालिटी चांगली असेल तर डिमांड देखील वाढते. अशा प्रकारे जर व्यवसाय चालू करायचा असेल तर हा व्यवसाय सुरु करणे तुमच्यासाठी फायदेशीर असू शकतो.
खर्च आकडा- एकूण खर्च :
७. ८२ लाख रुपये, २ लाख तुम्हाला लावावे लागतील. ( यामध्ये प्रत्येक प्रकारच्या मशनेरी आणि इक्यूपमेंट चा खर्च यात असेल ) कामासाठी लागणार भांडवल : ५ . ८२ लाख रुपये सरकार तुम्हाला देणार ( या मध्ये टोमॅटो, रॉ-मटेरियल, इन्ग्रेडिएंट, काम करणाऱ्यांचा पगार, पॅकिंग, टेलिफोन, भाडे या खर्चात असेल )
सरकार कडून अशी मिळणार मदत –
यामध्ये आपल्याला १.९५ लाख रुपये लावावे लागतील. टर्म कर्ज १. ५० लाख असेल. कामासाठी लागणाऱ्या भांडवलाचे कर्ज ४. ३६ लाख रुपये असेल. हे कर्ज मुद्रा योजना अंतर्गत कोणत्याही बँकेतून सहज मिळेल.
असा मिळणार फायदा-
७.८२ लाखाच्या गुंतवणुकी मध्ये, वार्षिक उत्पन्न २८.८० असेल. उत्पादन कास्ट : २४.२२ लाख रुपये असेल. निव्वळ नफा : ४.५८ लाख असेल. महिन्याला ४० हजार नफा मिळेल.
मुद्रा योजनेत करा अर्ज-
या योजनेच्या माध्यमातून तुम्ही कोणत्याही बँकेत अर्ज करू शकता. यासाठी तुम्हाला एक फॉर्म भरून द्यावा लागणार आहे. त्याचबरोबर यासाठी कोणत्याही प्रकारची प्रोसेसिंग फी आणि चार्जेस द्यावे लागणार नाहीत.