मुंबई बहुजननामा ऑनलाईन – राष्ट्रवादी कॉंग्रेसचे मुंबई अध्यक्ष सचिन अहिर यांनी शिवसेनेत आज सकाळी उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत प्रवेश केला. राष्ट्रवादी कॉंग्रेसला हा मोठा धक्का मानला जात आहे. आगामी निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर अहिर यांनी आपले भवितव्य सुरक्षित करण्याच्या दृष्टीने पक्षांतर केल्याचे बोलले जात आहे. तर सचिन अहिर भायखळा येथून निवडणूक लढविण्यास इच्छुक आहेत.
सचिन अहिर हे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे मुंबई अध्य़क्ष होते. त्यांनी राष्ट्रवादी सोडून आता शिवसेनेत प्रवेश केला. त्यामुळे मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेस सोडून शिवसेनेत प्रवेश करण्याने शिवसेनेचं बळ निश्चित वाढणार आहे.
सचिन अहिर यापुर्वी राष्ट्रवादी कॉंग्रेसकड़ून वरळी विधानसभेतून निवडणूक लढविली होती. मात्र त्यांचा शिवसेनेचे सुनील शिंदे यांनी पराभव केला. दरम्यान भाजपऐवजी शिवसेनेत प्रवेश करून भायखळा विधानसभेतून निवडणूक लढण्याचा त्यांचा मानस आहे. तर या मतदारसंघात सध्या एमआयएमचे वारीस पठाण आमदार आहेत.