बहुजननामा ऑनलाईन – छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जन्मोत्सवानिमित्त न्यू राज ज्वेलर्सच्या वतीने उस्मानाबाद येथे ‘सिंहासनाधीश्वर छत्रपती’ हे रांगोळी प्रदर्शन १८ ते २२ फेब्रुवारी या कालावधीत आयोजित करण्यात आले आहे. या प्रदर्शनाच्या माध्यमातून छत्रपती शिवरायांची रंगपूजा व रांगोळीद्वारे मानवंदना देण्यात येणार आहे.
शहरातील समता नगर परिसरातील पिताश्री श्रीमंतराव रणदिवे कॉम्पलेक्स, छत्रपती चौक येथे हे प्रदर्शन होणार आहे. प्रदर्शनाचे उद्घाटन जिल्हाधिकारी दीपा मुधोळ – मुंडे यांच्या हस्ते होणार असून यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक आर. राजा यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.