मुंबई : बहुजननामा ऑनलाइन – शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केलेल्या विधानामुळे भाजपच्या अडचणीत वाढ झाली आहे. ‘लिहून घ्या, मुख्यमंत्री हा शिवसेनेचाच होणार ‘ असा विश्वास शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केला आहे. मुंबईमध्ये आयोजित एका पत्रकार परिषदेमध्ये ते बोलत होते. त्यांच्या या विधानामुळे भाजपला धडकी बसणार हे नक्की.
एकीकडे राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर सत्तावाटपावरून भाजप-शिवसेनेत रस्सीखेच सुरू आहे. तर दुसरीकडे शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांची भेट घेतली होती. त्यांच्या या भेटीनंतर संजय राऊत यांनी मोठा खुलासा करत काहीही झालं तरी मुख्यमंत्री हा शिवसेनेचाच होणार असल्याचं संजय राऊत यांनी स्पष्ट केलं.
लोकसभा निवडणुकांच्या आधी सत्तेसंदर्भात युतीचा फॉर्म्युला ठरलेला आहे. त्यामुळे त्यानुसार आताही जागेची वाटणी व्हावी अशी शिवसेनेची भूमिका आहे. जर तसे झाले नाही तर आम्ही बहुमताने स्थिर सरकार स्थापन करू असंही राऊतांनी स्पष्ट केलं. तसेच ज्यांच्याकडे बहुमत नाही त्यांनी सरकार स्थापन करण्याची डेरिंग करू नये असा टोलाही संजय राऊत यांनी भाजपला लगावला आहे. भाजप देईल ती ऑफर स्वीकराण्यासाठी आम्ही दुकान टाकून बसलो नाही. आम्ही काही व्यापरी नाही, असंही संजय राऊत म्हणाले.
तसेच पवारांच्या भेटीमागे कोणतंही राजकारण नसल्याचं राऊत म्हणाले आहेत. शरद पवार महाराष्ट्राचे मोठे नेते आहेत. त्यामुळे महाराष्ट्राच्या हितासाठी त्यांच्याशी चर्चा झाली. त्यांनी निवडणुकांमध्ये त्यांची ताकद दाखवली आहे. तरी त्यांच्यासोबत कोणतीही राजकीय चर्चा झाली नाही असं संजय राऊत म्हणाले.
शिवसेना- राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सत्तास्थापनेविषयी चर्चेला उधाण आलं आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्यासह शिष्टमंडळ हे आज सोनिया गांधी यांच्या निवासस्थानी त्यांची भेट घेऊन चर्चा करणार असल्याची माहिती मिळाली आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण, विजय वडेट्टीवार, माणिकराव ठाकरे आदी नेते यावेळी उपस्थित राहणार आहे.
Visit : Bahujannama.com
- ‘हे’ १० पदार्थ आहेत अतिशय उपयुक्त, शरीरातील निकोटीन होईल ‘फ्लश आऊट’! –
- उपवास करणे फायद्याचे, पण या लोकांनी करू नये, अन्यथा होईल नुकसान ! –
- ‘वर्कआऊट’नंतर मांसपेशीत वेदना होतात का ? ‘हे’ प्रभावी उपाय करून पहा –
- तुमचा रंग सावळा आहे का ? याचे आरोग्यदायी फायदे जाणून व्हाल थक्क ! –
- मुलींनी मुलांसारखे कपडे परिधान केल्यास होऊ शकतो गर्भधारणेवर परिणाम ? –
- संक्रमणापासून बचावासाठी करा; या विटॅमिनचा वापर, जाणून घ्या –
- चांगल्या आरोग्यासाठी शरीराला दररोज किती कॅलरीजची असते आवश्यकता –
- वजन कमी करण्याचा ‘हा’ आहे खास ‘जपानी फार्मुला’! जाणून घ्या –