‘उद्धव ठाकरेंच्या सल्ल्याने खेडमध्ये आलोय, अजितदादा तुमच्या आमदारांना वेसण घाला’

shivsena-mp-sanjay-raut-slams-ncp-mla-dilip-mohite-over-khed-panchayat-samiti-dispute

पुणे : बहुजननामा ऑनलाईन –  राज्यातील महाविकास आघाडीच्या ज्येष्ठ नेत्यांमध्ये चांगले संबंध आहेत. मात्र, खेडमध्ये पंचायत समितीच्या सभापतीपदासाठी आमदार दिलीप मोहिते यांच्याकडून घाणेरडे राजकारण सुरु असल्याचा आरोप शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी केला आहे. तसेच आपण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सल्ल्यानुसार खेडमध्ये आलो आहोत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपल्या आमदाराला वेसन घालावे, असा सल्ला राऊतांनी दिला आहे. आम्ही देखील फोडाफोडी करू शकतो. आमदार मोहितेंची  वागण्याची पद्धत हीच राहिली तर पुढच्या वेळी महाविकास आघाडी राहू अगर नको, पण पुढच्यावेळी शिवसेनेचा आमदार असेल. राज्यात सर्वत्र सुरळीत सुरु असताना खेड तालुक्यात कुरघोडी होत असेल तर पालकमंत्र्यानी विचार करावा, असेही राऊत यांनी म्हटले आहे.

शिवसेनेचे विद्यमान सभापती भगवान पोखरकर आणि राष्ट्रवादीचे आमदार दिलीप मोहिते यांच्या गटातील खेड पंचायत समितीचा वाद थेट पक्षश्रेष्ठींपर्यंत पोहोचला आहे. या प्रकरणाची दखल घेत राऊत शुक्रवारी खेडमध्ये आले होेते. यावेळी पत्रकार परिषद घेत राऊतांनी  आमदार  मोहिते यांच्यावर निशाणा साधला. पंचायत समितीच्या जागेबाबत हा वाद आहे. लोक फोडून सत्ता स्थापन करायचे हे खेडमध्ये घडले आहे. आमदार मोहिते हे  शरद पवारांच्या पक्षात राजकारण करण्यासाठी लायक नाहीत. पंचायत समितीच्या जागेवरून एखाद्या आमदाराने राजकारण करणे हे परंपरेला धरून नाही. अजितदादांनी सांगून सुद्धा हे रेटून नेत असतील तर ह्याला माज आला असे म्हणतात. पंचायत समितीच्या सदस्यांना पैशांच्या अमिषाने पळवून नेले. हा विषय लवकरच आम्ही त्यांच्या प्रमुखांना कळवू असा इशारा राऊत यांनी दिला आहे.

कृपया हे देखील वाचा:
‘…तर तुमचं WhatsApp अकाऊंट बंद होईल’; जाणून घ्या

जामीनावर आला होता बाहेर, पुन्हा जेलमध्ये जाण्यासाठी आता PM मोदींना दिली जीवे मारण्याची धमकी

पुणेकरांना मोठा दिलासा ! सक्रिय रुग्णांची संख्या 5 हजारांच्या आत

Lockdown च्या गोंधळावर अजित पवारांचे रोखठोक मत, म्हणाले – ‘सरकार कोणाचंही असलं तरी मुख्यमंत्र्यांचा निर्णय अंतिम असतो’

बारामतीमध्ये भ्रष्टाचार फोफावतोय ? सरकारी अधिकारी अन् कर्मचार्‍यांकडून राजरोसपणे होतेय पैशांची मागणी