पुणे : बहुजननामा ऑनलाईन – पुणे शहरामध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस कमी होत आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत राज्यात पुण्यामध्ये सर्वाधिक रुग्ण आढळून आले होते. तसेच सर्वाधिक अॅक्टिव्ह रुग्ण (Active patient) पुण्यात होते. परंतु आता कोरोनाची दुसरी लाट ओसरत असून अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या देखील कमी झाली आहे. सध्या पुण्यामध्ये अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या पाच हजारांच्या आत आली आहे. त्यामुळे पुणेकरांना मोठा दिलासा मिळाला आहे. पुणे शहरात सध्या 4 हजार 842 अॅक्टिव्ह रुग्ण (Active patient) असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.
पुणे शहराची कोरोना स्थिती
शहरात गेल्या 24 तासात 349 नवीन रुग्णांचे निदान झाले आहे. पुणे शहरात आतापर्यंत कोरोना बाधित रुग्णांची संख्या 4 लाख 71 हजार 577 वर पोहचली आहे.
पुणे शहरात दिवसभरात 33 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
यामध्ये 21 रुग्ण शहरातील आहेत तर 12 रुग्ण शहराबाहेरील आहेत आतापर्यंत 8 हजार 361 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
दरम्यान 699 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आल्याने त्यांना घरी सोडण्यात आले आहे.
आजपर्यंत 4 लाख 58 हजार 374 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत आज दिवसभरात शहरातील विविध केंद्रावर 7 हजार 871 स्वॅब तपासणी करण्यात आली.
शहरात सक्रिय रुग्ण संख्या 4 हजार 842 इतकी आहे यापैकी 721 रुग्ण गंभीर आहेत.
तर 1372 रुग्ण ऑक्सिजनवर उपचार घेत आहेत .
अशी माहिती पुणे महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाने दिली आहे.
पुणे जिल्हा कोरोना स्थिती
कोरोना बाधीत एकूण 10 लाख 19 हजार 28 रुग्णांपैकी 9 लाख 79 हजार 840 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत.
ॲक्टिव्ह रुग्ण 22 हजार 238 आहे.
कोरोनाबाधित एकूण 16 हजार 950 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
मृत्यूचे प्रमाण 1.66 टक्के इतके आहे तर बरे होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण 96.15 टक्के आहे.
कृपया हे देखील वाचा:
Lockdown च्या गोंधळावर अजित पवारांचे रोखठोक मत, म्हणाले – ‘सरकार कोणाचंही असलं तरी मुख्यमंत्र्यांचा निर्णय अंतिम असतो’
बारामतीमध्ये भ्रष्टाचार फोफावतोय ? सरकारी अधिकारी अन् कर्मचार्यांकडून राजरोसपणे होतेय पैशांची मागणी
फायद्याची गोष्ट ! फक्त 100 रुपयांत LIC चा 75 हजारांचा विमा ‘कव्हर’, जाणून घ्या
राज्य पोलिस दल हादरलं ! पोलीस निरीक्षकाकडून महिला पोलीस शिपायावर बलात्कार, प्रचंड खळबळ
पुण्यात लसीकरण ‘सुपरफास्ट’ ! आतापर्यंत 11 लाख जणांना दिला ‘डोस’, ‘रिकव्हरी रेट’ देशात ‘अव्वल’