नवी दिल्ली : वृत्तसंस्था – दिल्लीच्या खजूरी खासमध्ये 22 वर्षीय व्यक्तीला कथित प्रकारे पंतप्रधान नरेंद्र मोदी PM Modi यांना जीवे मारण्याची धमकी दिण्याच्या आरोपात अटक केली आहे. हा व्यक्ती जामीनावर आला होता आणि त्याला परत जेलमध्ये जायचे होते. पीएम मोदी PM Modi यांना जीवे मारण्याची धमकी देण्यासाठी फोन कॉल करणार्या व्यक्तीचे नाव सलमान आहे.
आरोपीने पोलिसांना फोन केला आणि म्हटले, मला मोदीला ठार मारायचे आहे. इंडिया टुडेच्या रिपोर्टनुसार, कॉलनंतर पोलिसांनी त्यास पूर्वोत्तर दिल्लीच्या खजूरी खास परिसरात पकडले आणि चौकशीसाठी पोलीस स्टेशनमध्ये आणले. चौकशी दरम्यान पुन्हा जेलमध्ये जाण्यासाठी फोन केल्याचे त्याने सांगितले.
गुप्तचर विभागाचे अधिकारी करणार चौकशी
यानंतर पोलिसांना समजले की, सलमान विरूद्ध अगोदरही अनेक गुन्हे दाखल आहेत आणि तो जामीनावर बाहेर होता. प्रकरण पीएम मोदींशी संबंधीत असल्याने गुप्तचर अधिकारी सुद्धा सलमानची चौकशी करतील. मागच्या वर्षी जानेवारीत एका व्यक्तीला कथित प्रकारे पीएम मोदी आणि गृहमंत्री शहा यांना धमकी दिल्याप्रकरणी अटक केली होती. पोलिसांनी सांगितले की, त्याने नागरिकत्व दुरूस्ती कायदा आणि प्रस्तावित राष्ट्रीय नागरिक रजिस्टरद्वारे अंमबलबजावणी विरूद्ध ऑनलाइन संदेश पोस्ट केले होते.
कृपया हे देखील वाचा:
पुणेकरांना मोठा दिलासा ! सक्रिय रुग्णांची संख्या 5 हजारांच्या आत
बारामतीमध्ये भ्रष्टाचार फोफावतोय ? सरकारी अधिकारी अन् कर्मचार्यांकडून राजरोसपणे होतेय पैशांची मागणी
फायद्याची गोष्ट ! फक्त 100 रुपयांत LIC चा 75 हजारांचा विमा ‘कव्हर’, जाणून घ्या
राज्य पोलिस दल हादरलं ! पोलीस निरीक्षकाकडून महिला पोलीस शिपायावर बलात्कार, प्रचंड खळबळ