नवी दिल्ली : वृत्तसंस्था – देशविरोधी आणि भडक भाषणे केल्याचा आरोप असलेल्या जवाहरलाल नेहरू विद्यापीठाचा (जेएनयू) माजी विद्यार्थी शरजील इमामच्या बिहारच्या जहानाबाद येथून मुसक्या आवळण्यात आल्या आहेत. दिल्ली आणि बिहार पोलिसांनी त्याला मंगळवारी दुपारी अटक केली आहे. यापुर्वी सोमवारी रात्री शरजीलच्या भावाला आणि इतर मित्रांना अटक करण्यात आली होती. शरजीलचा दिल्ली, बिहार, उत्तरप्रदेश, मणिपूर, आसाम आणि अरूणचलचे पोलिस शोध घेत होते.
JNU Student Sharjeel Imam has been arrested from Jahanabad,Bihar by Delhi Police. Imam had been booked for sedition by Police. More details awaited. pic.twitter.com/7zFmWFbWIf
— ANI (@ANI) January 28, 2020
JNU Student Sharjeel Imam has been arrested from Jahanabad,Bihar by Delhi Police. Imam had been booked for sedition by Police. More details awaited. pic.twitter.com/RJgtGNYH4c
— ANI (@ANI) January 28, 2020
शरजील इमामच्या प्रक्षोभक भाषणाचा व्हिडिओ व्हायरल
चार दिवसांपूर्वी शरजील इमामचा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता. ज्यामध्ये अलीगड मुस्लिम युनिव्हर्सिटीच्या व्यासपीठावरून पूर्वोत्तर राज्य आसामला भारतापासून वेगळे करण्याचे बोलत आहे. त्याने म्हटले की, मुस्लिमांनी आपली ताकद दाखवून कमीत कमी एक महिन्यापर्यंत आसामचा संपर्क भारतापासून तोडला पाहिजे. यासाठी रेल्वे ट्रॅकवर एवढा भराव टाकला पाहिजे की, तो काढता-काढता एक महिन्याचा कालावधी लागला पाहिजे. परंतु, या व्हिडिओच्या सत्यतेबाबत हे वृत्त देणार्या वृत्तवाहिनीने देखील साशंकता वर्तविली आहे. शरजील इमामवर प्रक्षोभक भाषण केल्याप्रकरणी देशद्रोहाचा गुन्हा दाखल केला आहे.
Visit : bahujannama.com