बहुजननामा ऑनलाईन टीम – महाराष्ट्रात राजकीय उलाढाली सुरूच आहेत. पुढे काय होणार आहे हे कोणालाही ठाऊक नाही? पण या दरम्यान शरद पवारांच्या अगदी जवळची व्यक्ती गेल्या तीन दिवसांपासून बेपत्ता आहे. प्रफुल्ल पटेल यांनी या घडामोडींवर अद्याप कोणतेही भाष्य केलेले नाही. ते राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे निकटचे मानले जातात. त्याचे शेवटचे ट्विट २१ नोव्हेंबर रोजी म्हणजेच गुरुवारी आले. तेही फुटबॉलच्या बाबतीत. पण यानंतर ते सोशल मीडियावर अॅक्टिव दिसले नाहीत.
अजितदादांनी पक्षाशी बंडखोरी केल्यानंतरही प्रफुल्ल पटेलकडून कोणताही प्रतिसाद मिळालेला नाही. प्रफुल्ल पटेल हे सध्या एअर इंडिया घोटाळ्याच्या तपासाला सामोरे जात आहेत. शनिवारी अजितदादांची समजूत काढण्यासाठी राष्ट्रवादीकडून दोनदा प्रयत्नही झाले. यासाठी दिलीप वळसे पाटील आणि हसन मुश्रीफ, जयंत पाटील, छगन भुजबळ यांनी अजित पवारांची भेट घेतली.
सामान्यत: अशी प्रकरणे सोडविण्यासाठी शरद पवार माजी केंद्रीय मंत्री प्रफुल्ल पटेल यांना पाठवतात. मिळालेल्या माहितीनुसार, घोटाळ्याची चौकशी टाळण्यासाठी प्रफुल्ल पटेल शांत बसले आहेत. तसेच शरद पवार जर स्वतः हे प्रकरण हाताळत असतील तर दुसऱ्या कोणाची काय गरज? असे म्हंटले जात आहे.
तसेच, अजितदादांच्या बंडखोरीविषयी प्रफुल्ल पटेल यांना माहिती होती, अशी माहिती पक्षाच्या आतूनही आली आहे पण त्यांनी पक्षाला वेळेत माहिती दिली नाही. दरम्यान, कोणताही नेता प्रफुल्ल पटेल कोठे आहे हे अचूकपणे सांगू शकत नाही?