बहुजननामा ऑनलाइन टीम – दिवाळीचा सण येणार आहे आणि अगदी या अगोदर शनिवार, 7 नोव्हेंबर 2020 ला शनी पुष्य नक्षत्र (Shani Pushya Nakshatra)आहे. पुष्य नक्षत्राला ऋग्वेदमध्ये मंगलकारक म्हटले आहे. या विशेष काळात खरेदी करणे अतिशय शुभ मानले जाते. ज्योतिषाचार्यांनुसार, या काळात खरेदी केलेली वस्तू दिर्घकाळ लाभ देते. शनी पुष्य नक्षत्रात कोण-कोणत्या वस्तू खरेदी कराव्यात किंवा कोणती कामे करणे शुभ आहे, ते जाणून घेवूयात…
हे आहे शुभ
1. पुष्य नक्षत्रात सोन्याच्या वस्तू खरेदी करणे खुप शुभ मानले जाते. सोन्याचे दागिने शुद्ध, पवित्र आणि अक्षय धातुच्या रूपात मानले जातात. या नक्षत्रात गुरु, शनी आणि चंद्राचा प्रभाव असतो.
2. पुष्य नक्षत्रात घर, जमीन आणि गाडी खरेदी करणे सुद्धा शुभ असते. घर किंवा मंदिराच्या निर्मितीसाठी सुद्धा हा काळ उत्तम मानला जातो. या नक्षत्रात शिल्प, पेंटिंग आणि पुस्तक खरेदी करणे सुद्धा शुभ असते.
3. पिंपळाच्या झाडाला पुष्य नक्षत्राचे प्रतिक म्हटले जाते. या नक्षत्रात जन्मणारे लोक घराच्या एखाद्या भागात पिंपळाचे झाड लावून त्याची पूजा करतात. यामुळे घरात आनंद कायम राहातो.
4. पुष्य नक्षत्रात पूजा, उपवास करणे सुद्धा मोठे लाभदायक असते. सूर्योदय आणि सूर्यास्ताच्या वेळी तूपाचा दिवा लावून माता लक्ष्मीची पूजा करावी. कार्तिक मासात माता लक्ष्मीची पूजा खुप लाभदायक ठरते.
5. पुष्य नक्षत्रात डाळ, खिचडी, तांदूळ, बेसन, कडी, बूंदीचे लाडू खाणे सुद्धा खुप शुभ मानले जाते. या शुभ काळात या वस्तूंचे दान करूनही खुप पुण्य मिळते.
6. या दिवशी दुकान उघडणे, व्यापार करणे किंवा कोणत्याही कामाची सुरूवात करणे सुद्धा खुप शुभ आहे. अगोदरपासून व्यापार करत असलेल्या लोकांनी या दिवशी वही खात्याची पूजा करणे आवश्यक आहे.
7. पुष्य नक्षत्रात चमत्कारी वनस्पती आणून त्यांची सिद्धी केली जाते. या दिवशी कुंडलीत विद्यमान दूषित सूर्याचा दुष्प्रभाव कमी करता येऊ शकतो.
8. गुंतवणुकदारांसाठी सुद्धा हा काळ खुप शुभ मानला जातो. या कालावधीत केलेले इन्व्हेस्टमेंट प्लॅन दिर्घकाळ लाभ देतात.
9. पुष्य नक्षत्रात पिंपल, शमी किंवा महालक्ष्मीची पूजा करणे खुप शुभ असते.
10. गुरु-पुष्य किंवा शनी-पुष्य योगात नवे संस्कार किंवा शिक्षण ग्रहण करण्यासाठी विद्यालय किंवा गुरुकुलात पाठवण्यास सुरूवात करणे मोठे फलदायी असते.