नवी दिल्ली : वृत्तसंस्था – कोरोना व्हायरस दरम्यान पुन्हा शाळा सुरु करण्याची तयारी सुरु झाली आहे. मुलांच्या शिक्षणाचे नुकसान होणार नाही आणि शाळा उघडल्यावर मुले, पालकांनी काय काय करायला पाहिजे हे सुनिश्चित करण्यासाठी एनसीईआरटीने आपल्या मार्गदर्शक सूचनांचा मसुदा सरकारला सादर केला आहे.
एका हिंदी वृत्तपत्राच्या वृत्तानुसार, शासनाला सादर केलेल्या मसुद्यात असे म्हटले आहे की, शाळा उघडल्यानंतर रोल नंबरनुसार ऑड-इव्हन फॉर्म्युला लागू केला जाईल किंवा वर्ग दोन शिप्टमध्ये घेण्यात येतील. मुलांना शाळेत पोहण्याच्या वेळा देखील वर्गानुसार 10-10 मिनिटांच्या अंतराचा कालावधी असेल. मसुद्यात अशीही शिफारस करण्यात आली आहे की, सामाजिक अंतरानुसार शाळेतील वर्ग मैदानात भरवणे हे योग्य ठरेल.
या सहा टप्प्यात अभ्यास सुरु होईल
1. पहिल्या टप्प्यात अकरावी आणि बारावी वर्ग सुरु केले जातील.
2. एका आठवड्यानंतर नववी आणि दहावीचा अभ्यास सुरु होईल
3. तिसऱ्या टप्प्यात दोन आठवड्यानंतर सहावी ते आठवीचे वर्ग सुरु होतील.
4. तीन आठवड्यानंतर तिसरी ते पाचवी या वर्गाचा अभ्यास सुरु होईल.
5. पाचप्या टप्प्यात पहिली आणि दुसरीचे वर्ग सुरु होतील.
6. सहाव्या टप्प्यात पालकांच्या परवानगीने नर्सरी ते केजी वर्ग पाच आठवड्यानंतर सुरु होतील. मात्र, कंटेनमेंट झोनमधील शाळा ग्रीन झोन होईपर्यंत बंद राहतील.
शाळेत हे उपाय अवलंबले जातील
– वर्गातील विद्यार्थ्यांमध्ये 6 फूट अंतर आवश्यक आहे. एका खोलीत 30 किंवा 35 मुले असतील.
– क्लासरुमचे दरवाजे आणि खिडक्या उघड्या असतील आणि एसी सूरू राहणार नाही
– वर्ग सुरु झाल्यानंतर, दर 15 दिवसांनी आपल्याला मुलाच्या प्रगतीबद्दल पालकांशी बोलावे लागेल.
– दररोज खोल्या स्वच्छ केल्या पाहिजेत हे व्यवस्थापनाचे काम असेल. सकाळचे सत्र आणि वार्षिक कार्यक्रम होणार नाहीत.
– मुलांना ऑड-इव्हन फॉर्म्युल्यानुसार शाळेत बोलवले जाईल. परंतु दररोज घरचा अभ्यास द्यावा लागेल.
– मुलाची बसण्याची जागा बदलू नका, डेस्कवर नाव लिहले जाईल. विद्यार्थ्याला त्याच ठिकाणी बसवावं
– शाळेत प्रवेश करण्यापूर्वी शिक्षक आणि कर्मचारी मुलांची स्क्रिनिंग करतील, शाळेबाहेर कोणत्याही खाद्यपदर्थाचे स्टॉल्स लावण्यात येणार नाहीत.
– मुलांना पुस्तक, पेन, पेन्सिल किंवा अन्न शेअर करण्यास मनाई असेल. मुलांना स्वत:चे पाणी आणावे लागेल.
– प्रत्येक मुलाला मास्क घालणे आवश्यक असेल. जर शाळा सामाजिक अंतराची काळजी घेत नसेल तर मुलांच्या पालकांना त्याची माहिती दिली जाईल.
या गोष्टींचीही काळजी घ्यावी लागेल
– वैद्यकीय, सुरक्षा किंवा स्वच्छताविषयक कामांशी संबंधित पालकांना शाळेला अगोदर माहिती द्यावी लागेल.
– केवळ अशाच पालकांना शिक्षकांना भेटता येईल, जे फोनवर संपर्क साधू शकत नाहीत
– पालक-शिक्षकांची बैठक होणार नाही. वाहतुकीसंदर्भात लवकरच एक मार्गदर्शक सूचना प्रसिद्ध केली जाईल.
– हॉस्टेलमध्ये देखील बेडमध्ये सहा-सहा फुटांचे अंतर ठेवावे लागेल.