नवी दिल्ली : वृत्तसंस्था – शेजारील देश चीनमधून एक विचित्र प्रकरण समोर आले आहे. येथे एका व्यक्तीच्या मागून एक मासा त्याचा पोटात गेला. त्याच्या गुदाशयात एक संपूर्ण मासा असल्याचे तपासातून समोर आले आहे. त्या व्यक्तीने सांगितले की, तो चुकून एका माशावर बसला. त्यानंतर तो मागच्या बाजूने पोटात गेली. त्यांनतर, डॉक्टरांनी ऑपरेशन केले आणि मासा बाहेर काढला, तोपर्यंत त्या व्यक्तीला त्याच्या मोठ्या आतड्यात मोठ्या प्रमाणात दुखापत झाली होती..
वास्तविक, संपूर्ण प्रकरण चीनच्या गुआंगडोंग प्रांताचे आहे. येथे राहणारा एक 30 वर्षीय तरुण ब्लू तिलापिया माशावर बसला. ज्यानंतर मासा गुदाशयातून त्याच्या पोटात गेला. यावेळी माश्याने मोठ्या आतड्यात बऱ्याच जखमा केल्या. यानंतर या युवकाला ओटीपोटात दुखणे सुरू झाले. तो झाओकींग फर्स्ट पीपल्स हॉस्पिटलमध्ये पोहोचला. जेथे डॉक्टरांनी त्वरित एक्स-रे काढला. त्यात मोठ्या आतड्यात मासा अडकलेला दिसला. यानंतर, डॉक्टरांनी त्या व्यक्तीचे ऑपरेशन केले आणि त्याच्या शरीरातून ब्लू तिलापिया मासा बाहेर काढला. मासा सुमारे 12 ते 16 इंच लांब होता आणि पोटातच मेला होता.
दरम्यान, लोक चीनमध्ये ब्लू तिलापिया मासा पाळतात. इथले लोक मोठ्या उत्साहाने याला खातात. हा इतके गुळगुळीत असतो की, त्याला हातात धरून ठेवणे फार कठीण आहे. त्याचे पालन बर्याच देशात केले जाते जेणेकरून डासांचा नाश होऊ शकेल. कारण हे मासे डास आणि अळ्या मारतात. यामुळे डास मरतात आणि मलेरियाचा धोका कमी होतो.