बहुजननामा ऑनलाईन – करोना विषाणुमुळे देशासह राज्यातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. संसर्गजन्य आजार असलेल्या करोनामुळे गर्दी होणार्या कार्यक्रमाचे आयोजन रद्द करण्यात येत आहे. त्याचा तडाखाअखिल भारतीय मराठी नाट्य साहित्य संमेलनाला बसला आहे.27 मार्च पासून सुरू होणार्या 100 व्या नाट्य संमेलनावर तात्पुरता पडदा टाकण्यात आला आहे. नाट्य संमेलन पुढे ढकलत असल्याची घोषणा नाट्य परिषदेने केली आहे.
राज्यातील मुंबई, पुणे अशा महत्त्वाच्या शहरांमध्ये करोनाची लागण झालेले रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे सध्या महाराष्ट्रात भितीचे वातावरण पसरले आहे. सरकारकडून वारंवार नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन करण्यात येत आहे. मात्र तरीदेखील करोनाविषयीची भीती नागरिकांमध्ये पसरली आहे.त्याचा परिणाम सांगलीत होणार्या 100 व्या अखिल भारतीय मराठी नाट्यसंमेलनावर झाला आहे.
यंदा सांगलीत होणार्या 100 व्या अखिल भारतीय मराठी नाट्यसंमेलनाची तारीख पुढे ढकलण्यात आल्याची माहिती नाट्य परिषदेकडून देण्यात आली आहे. यंदाचे नाट्य संमेलन 27 मार्च ते 14 जून या कालावधीमध्ये संपन्न होणार होते.मात्र,कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रादुर्भावाने निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे अखिल भारतीय मराठी नाट्यपरिषदेचे 100 वे महाराष्ट्रव्यापी नाट्यसंमेलन पुढे ढकलले आहे.यासंदर्भात काही दिवसापूर्वी जयंत पाटील यांनी आयोजकांची बैठक घेतली होती. या बैठकीमध्ये संमेलन यशस्वीरित्या करण्याची चर्चा झालीहोती . राजकीय स्तरावर या संमेलनाविषयी उत्साहाचे वातावरण होते. मात्र प्रशासकीय पातळीवर हे संमेलन पुढे ढकलण्याचा पर्याय सुचविण्यात आला होता. सध्या देशावर कोरोनाचे संकंट असल्यामुळे हा धोका लक्षात घेत होणारे संमेलन पुढे ढकलण्याचा निर्णय सांगलीचे निवास उपजिल्हाधिकारी यांनी दिला आहे. मात्र आता हे नाट्य संमेलन कोणत्या तारखेला होणार हे मात्र स्पष्ट करण्यात आलेले नाही.