नवी दिल्ली : वृत्तसंस्था – चीनमधील एका माणसाच्या फुफ्फुसांचा एक्स-रे काढण्यात आला असून त्यातून काहीतरी भयानक गोष्ट समोर आली आहे. कोरोना विषाणू कशाप्रकारे फुफ्फुसात प्रवेश करतो आणि श्वासोच्छवास थांबवतो, स्पष्टपणे दिसत आहे. ब्लॅक अॅन्ड व्हाईट एक्स-रेमध्ये तुम्हाला बर्याच पांढर्या रॅशेस दिसतील. तसेच एक्स-रे मध्ये दिसणारे हे डाग कोरोना विषाणूने प्रभावित भाग असून तेथे कफ तयार होत आहे.
एक्स-रे मध्ये असलेल्या रेडिओलॉजिस्ट पांढऱ्या रॅशेसला ग्लास ओपेसिटी म्हणतात. याचा अर्थ ज्या ठिकाणी फुफ्फुसांमध्ये हवा आहे तेथे कोरोना विषाणू विकसित झाला आहे. त्या ठिकाणी तो कफ तयार करत असल्यामुळे लोकांना श्वास घेण्यास अडचण होते. एक्स-रे समोर आलेल्या माणसाला वुहानच्या मांस बाजारात संसर्ग झाला होता. जगभरातील डॉक्टरांना कोरोना व्हायरस रूग्णांच्या एक्स-रे आणि सीटीस्कॅनमध्ये अशाच पांढर्या रॅशेस दिसल्या आहेत. हे सार्स आणि मर्स सारख्या आजारांच्या एक्स-रेशी जुळत असून कोरोना विषाणूचे एक्स-रे सार्स आणि मर्स पेक्षा अधिक भयावह असल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे. रेडिओलॉजिस्ट यांना कोरोनातील सर्व रूग्णांच्या एक्स-रे आणि सीटीस्कॅनमध्ये ग्लास ओपेसिटी अधिक प्रमाणात दिसले आहे.
रेडिओलॉजिकल सोसायटी ऑफ नॉर्थ अमेरिका (RSNA) यांनी याबाबतचे फोटो प्रसिद्ध केले आहेत. त्यांनी १००० रूग्णांची तपासणी केली असून सर्वांच्या छातीचे एक्स-रे आणि सीटीस्कॅन केले. यानंतर प्रत्येकाच्या एक्स-रे आणि सीटीस्कॅनमध्ये समानता दिसून आली. तेव्हा हे समजले की, कोरोना रूग्णाच्या फुफ्फुसातील पांढरे डाग हे किती भयंकर असतात.
Chest CT outperformed lab testing in the diagnosis of 2019 novel #coronavirus disease (#COVID19), according to a study of more than 1,000 patients just published in @radiology_rsna: https://t.co/JoObdXPNbx #CoronavirusOutbreak pic.twitter.com/Ak5n4XL9GQ
— RSNA (@RSNA) February 26, 2020
वुहान येथील ५४ वर्षीय महिलेच्या फुफ्फुसांचे सीटी स्कॅन केल्यावर त्यात ग्लास ओपेसिटी आढळली. कोविड-१९ मुळे तिला न्यूमोनिया झाला होता. या महिलेला श्वास घ्यायला इतकी अडचण येत होती कि तिला ऑक्सिजन द्यावा लागला.